नागपूर: भाजपजे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गेल्या काही दिवसांत महाविकास आघाडी सरकारविरोधांत मोहिम उघडत आरोपांचा सपाटा लावला होता. सोमय्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस नेत्यावंर अनेक गंभीर आरोप केले होते. या आरोपांविरोधात कॉंग्रेस आता आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात नागपूरच्या जिल्हा न्यायालयात दिवाणी आणि फौजदारी गुन्ह्यानुसार मानहाणीचा दावा दाखल केला आहे. विशेष म्हणजे मानहानीच्या दाव्याची रक्कम ही चक्क एक रुपया ठेवण्यात आली आहे.
हे देखील पहा -
वृत्त वाहिन्यांवरील चर्चासत्रात काँग्रेस पक्षावर निराधार आरोप करत बदनामी केल्याचा आरोप अतुल लोंढे यांनी किरीट सोमय्यांवर केला आहे. यापूर्वी अतुल लोंढे यांनी सोमय्यांविरोधात नागपुरच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. तेव्हाच अतुल लोंढेंनी ३ नोव्हेंबर रोजी सोमय्यांवर निशाणा साधल म्हटलं होतं की, "कोर्टात दोन कवडींचा दावा करता येत नाही म्हणून सोमय्यांविरोधात एक रुपयाचा दावा दाखल करणार आहे." या विधानानंतर अखेर अतुल लोंढे यांच्यावर नागपूरच्या जिल्हा न्यायालयात चक्क एक रुपयाचा दावा दाखल केला आहे.
काय होतो सोमय्यांचा आरोप?
अतुल लोंढे म्हणाले की, किरीट सोमय्या यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीवर बोलताना "वसुलीच्या पैशातील ४० टक्के शिवसेना, ४० टक्के राष्ट्रवादी काँग्रेस व २० टक्के हिस्सा काँग्रेसला मिळतो." सोमय्यांच्या यात वक्तव्याविरोधात अतुल लोंढे यांनी हा दावा दाखल केला आहे. दरम्यान या १ रुपयाच्या दाव्याला सोमय्या काय उत्तर देतात हे पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.