Suresh Barsing contribution to the Dalit Panther movement saam tv
महाराष्ट्र

जीवाभावाचा पँथर मित्र हरपला; RPI च्या दिग्गज नेत्याचे निधन; राजकारणात शोककळा

RPI national Secretary Suresh Barsing Passes Away: रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सचिव आणि ठाणे-पालघर जिल्ह्याचे प्रभारी सुरेश बारसिंग यांचे चेंबूरमधील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले.

Omkar Sonawane

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुरेश बारसिंग यांचे आज चेंबुरमधील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. आंबेडकरी चळवळीत आयुष्य समर्पित केलेले दलित पँथर चळवळीपासुन मला साथ देणारे सुरेश बार्शिंग यांच्या निधनाने जीवाभावाचा पँथर मित्र हरपला आहे. अशा शब्दात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिवंगत सुरेश बारसिंग यांना श्रध्दांजली वाहिली. उद्या दिनांक 30 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता चैत्यभूमी दादर येथील स्मशानभूमीत दिवंगत सुरेश बारसिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

दिवंगत सुरेश बारसिंग हे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सचिव तसेच ठाणे आणि पालघर जिल्हयाचे ते प्रभारी होते. त्यांनी अनेक वर्षे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना साथ दिलेली आहे. रामदास आठवले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गेल्या चार दशकांपासुन ते रामदास आठवले यांच्यासोबत सावलीसारखे राहिले आहेत. दलित पँथर चळवळीपासुन रामदास आठवले यांच्या नेतृत्चाला बळ देण्याचे काम सुरेश बारसिंग यांनी केले. आंबेडकरी चळवळीत त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले होते. सांगली जिल्हयातील माहुली गावचे ते मुळचे रहिवाशी होते. त्यानंतर मुंबईत वडाळा सिध्दार्थ हॉस्टेल येथून त्यांनी दलित पँथर चळवळीमध्ये सहभाग घेतला. सुरुवातीच्या काळात त्यांनी बँकेमध्ये नोकरी केली.

बँकेमध्ये नोकरी करत असतांना त्यांनी दलित पँथर आणि त्यानंतर भारतीय दलित पँथरमध्ये सक्रिय सहभाग घेतला. रामदास आठवले यांच्यासोबत अगदी युवा वयापासुनच त्यांचे रामदास आठवले यांच्याशी जवळचे संबंध होते. अगदी जीवाभावाचे मित्र म्हणून त्यांनी रामदास आठवले यांच्यासोबत चळवळीत सहभाग घेतला. दिवंगत सुरेश बारसिंग यांच्या निधनाने रिपब्लिकन चळवळीची फार मोठी हानी झालेली आहे. दलित पँथर, भारतीय दलित पँथर, रिपब्लिकन पक्षाच्या काळात दिवंगत सुरेश बारसिंग यांनी आपल्या नेतृत्वाला प्रचंड साथ दिली. आपल्या नेतृत्वावर त्यांनी प्रचंड विश्वास ठेवून चळवळीमध्ये स्वतला झोकुन दिले. सुरेश बारसिंग यांच्या निधनाने आपल्याला प्रचंड दुःखाचा धक्का बसलेला आहे. सुरेश बारसिंग यांच्या निधनाने रिपब्लिकन चळवळीची आंबेडकरी चळवळीची प्रचंड हानी झालेली आहे. ती हानी कधीही भरुन निघणार नाही. सुरेश बारसिंग यांच्या स्मृती कायम आमच्या हदयात जोपासल्या जातील.

सुरेश बारसिंग यांनी ठाणे आणि पालघर जिल्हयात संघटन बांधणीमध्ये तसेच राज्यातही संघटन वाढवण्यात मोठे योगदान दिले. भारतीय दलित पॅंथर आणि रिपब्लिकन पक्षात त्यांनी स्वतला झोकुन देवून संघटन मजबुत केले होते. दलित पँथरच्या काळात त्यांना आपुलकीने लोक दलित पँथरचा दारासिंग म्हणत होते. ते प्रचंड हट्टे कट्टे मजबुत देहयष्टीचे होते. त्यामुळे त्यांची उंची आणि मजबुत बांधा बघुन लोक त्यांना आवडीने दारासिंग म्हणायचे. महाराष्ट्रात ते दलित पँथरचे दारासिंग म्हणून प्रसिध्द होते. भारतीय दलित पँथरचे संरक्षक प्रमुख म्हणून त्यांनी प्रचंड मोठी कामगिरी केलेली आहे. त्यांनी आंबेडकरी चळवळीत दिलेल्या योगदानाचा आम्हाला सदैव अभिमान आणि स्मरण राहील. सुरेश बारसिंग यांच्या रुपाने दलित पँथरचा जीवाभावाचा पँथर मित्र हरपला आहे. त्यांच्या निधनाने माझी आणि पक्षाची, समाजाची फार मोठी हानी झालेली आहे अशी शोकभावना रामदास आठवले यांनी व्यक्त केली. सुरेश बारसिंग यांच्या पश्चात त्यांना दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Love Story : प्रेमाला उपमा नाही... प्रेयसी ७ वर्षे कोमात, प्रियकरानं साता जन्मासारखी वाट बघितली; शुद्धीवर येताच आयुष्यभराची गाठ बांधली

Maharashtra News Live Update : पाणी नियोजनाच्या बैठकीत माजी खासदार संजयकाका पाटलांचा रौद्रअवतार

Makeup Tips For Women: ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी खास मेकअप टिप्स, 5 मिनिटांत होईल सुंदर मेकअप

ठाण्यात १० टक्के पाणीकपात कायम, पण वार बदलला; कोणकोणत्या भागांत पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम? वाचा

Floral Printed Saree Designs: सणासुदीला घालण्यासाठी महिलांसाठी खास फ्लोरल प्रिंटेड साड्या: ५ डिझाईन्स ट्रेंडिंगमध्ये!

SCROLL FOR NEXT