Ramdas Athawale On Ajit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Ramdas Athawale On Ajit Pawar: आमचे मंत्रिपद अजितदादांनी पळवले; रामदास आठवलेंनी करून दिली आठवण

Ramdas Athawale Statement: त्याचसोबत यावेळी त्यांनी आमचे मंत्रिपद अजितदादांनी पळवले असल्याची टीका करत आता तरी आमचा कोटा आम्हाला मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Priya More

Nagpur News: आगामी लोकसभा (Loksabha Election) आणि विधानसभा निवडणुकीमध्ये (Vidhansabha Election) जागा मिळाव्यात यासाठी आरपीआयचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Minister Ramdas Athawale) यांचे प्रयत्न सुरु आहेत. सध्या नागपूरच्या दौऱ्यावर असलेल्या रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रात लोकसभेच्या २ जागा आणि विधानसभेच्या १० ते १२ जागा द्याव्या अशी मागणी त्यांनी केली. त्याचसोबत यावेळी त्यांनी आमचे मंत्रिपद अजितदादांनी पळवले असल्याची टीका करत आता तरी आमचा कोटा आम्हाला मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, 'आम्ही ३५० जागा जिंकू असा आम्हाला विश्वास आहे. आम्हाला २ तरी जागा द्याव्या अशी मागणी आहे. उत्तर प्रदेशमध्ये रिपब्लिकन पक्ष वाढत आहे त्यामुळं उत्तर प्रदेशमध्ये आमच्या पक्षालासोबत घ्यावे. देशभरात १० ते १२ जागा भाजपने द्याव्या अशी आमची मागणी आहे.'

तसंच, 'एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे सोबत आहेत. त्यांनी आता इतर पक्षाला सोबत घेऊ नये. आमचे मंत्रिपद अजितदादा यांनी पळविले. आता आमचा कोटा आम्हाला मिळावा अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या २ जागा आणि विधानसभेच्या १० ते १२ जागा द्याव्या अशी आमची मागणी आहे. आम्ही गाव तिथे आमची शाखा तयार करू. आम्ही सर्व जातीच्या लोकांनासोबत घेणार आहोत.', असे मत त्यांनी व्यक्त केले.

'आम्हाला सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाही किंवा युती झाली नाही. तर आपली स्वबळावर तयारी असली पाहिजे म्हणून आम्ही तयारी करत आहोत.', असे देखील त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या प्रधानमंत्री रोजगार मेळाव्याचे कौतुक देखील केले आहे. त्यांनी सांगितले की, 'प्रधानमंत्री रोजगार मेळाव्यांतर्गत बेरोजगारांना रोजगार प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. वर्षभरात 10 लाख तरुणांना रोजगार देणार आहोत. सबका साथ सबका विकास या अनुषंगाने सरकार काम करत आहे.'

यावेळी रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. 'सरकारचा सामना करण्याची भूमिका राहुल गांधी यांनी सोडली. हा राहुल गांधी यांचा पळफुटेपणा आहे. लोकांसाठी त्यांनी पदावर राहायला हवे होते. इंडिया म्हणून नाव देणे विरोधकांनी नको होते. आम्ही स्पेलिंग म्हणू इंडिया म्हणू. त्यांच्याकडे पंतप्रधान पदाचे उमेदवार नाही. सर्वच पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून वावरतात.' असा देखील टोला त्यांनी यावेळी लगावला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Onion Crop : धुक्यामुळे कांदा पिक धोक्यात; रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी हवालदिल

VBA News : वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध! पाहा नेमकं काय आहे जाहीरनाम्यात | Video

Sneeze: शिंकताना डोळे का बंद होतात? जाणून घ्या एका क्लिकवर

Crime News : ३-३ गर्लफ्रेंड, महागडं गिफ्ट द्यायचं होतं; पठ्ठ्या थेट बँक लुटायला गेला, पण सगळा घोळ झाला!

Maharashtra News Live Updates: बारामतीत भाजपला मोठा धक्का; बड्या नेत्याचा शरद पवार गटात प्रवेश

SCROLL FOR NEXT