Saam
महाराष्ट्र

मुंबईतील 20 जागा आम्हाला द्या, मित्र पक्षाची महायुतीकडे मागणी, केंद्रीय मंत्री नेमकं काय म्हणाले?

RPI Athawale: कांदिवली पश्चिमेत रिपाई आठवले गटाचा भव्य संकल्प मेळावा पार पडला. मंत्री रामदास आठवले यांनी महापालिका निवडणुकीच्या तयारीचे आदेश दिले. शेकडो कार्यकर्त्यांनी विविध पक्ष सोडून रिपाईत प्रवेश केला.

Bhagyashree Kamble

  • कांदिवली पश्चिमेत रिपाई आठवले गटाचा भव्य संकल्प मेळावा पार पडला.

  • मंत्री रामदास आठवले यांनी महापालिका निवडणुकीच्या तयारीचे आदेश दिले.

  • शेकडो कार्यकर्त्यांनी विविध पक्ष सोडून रिपाईत प्रवेश केला.

  • मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अवघे काही महिने राहिले आहेत. महापालिका निवडणुकीची चाहूल लागताच प्रत्येक पक्षाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशातच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) देखील मैदानात उतरली असून, कांदिवली पश्चिम येथे उत्तर मुंबई जिल्हा रिपाई कार्यकर्त्यांचा भव्य संकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्याला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्ष ॲक्शन मोडमध्ये आला आहे. कांदिवली पश्चिम येथे उत्तर मुंबई जिल्हा रिपाई कार्यकर्त्यांचा भव्य संकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्याला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत, उत्तर पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हजारोंच्या संख्येने महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त हजेरी लावली.

रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. तसेच, उत्तर पश्चिम जिल्ह्यातील ४२ नगरसेवक जागांपैकी ८ आणि मुंबईतील २० जागा रिपाईला मिळाव्यात, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार

महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार, असा विश्वास यावेळी रामदास आठवले यांनी व्यक्त केला. 'मुंबई महानगरपालिका महायुतीच्या ताब्यात आली पाहिजे. हा आमचा उद्देश आहे. भाजपचे मुंबईत ताकत आहे. महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार', असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला. 'भाजपचा महापौर होणार आणि रिपाईला उपमहापौर पद मिळावे अशी आम्ही मागणी करणार', असं रामदास आठवले म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sheikh Hasina: मोठी बातमी! शेख हसीना यांना फाशीची शिक्षा, १४०० जणांच्या हत्याप्रकरणात दोषी

कल्याणमध्ये मध्यरात्री तरूणाची दादागिरी; कोयता घेऊन धिंगाणा, गाड्या अडवून...

Hindu Wedding Rituals: लग्नानंतर गृहप्रवेशाच्या वेळी नववधू का तांदळाचं माप का ओलांडते?

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या ६० आमदारांविरोधात काम केलं, तानाजी सावंत यांचा गौप्यस्फोट

Girija Oak in Laws Family: अभिनेत्री गिरिजा ओकचे सासू-सासरे कोण? काय करतात?

SCROLL FOR NEXT