परळीत बन्सल क्लासेस चालकांकडून सत्यनारायणाच्या नावाखाली शाही पार्टी! SaamTVnews
महाराष्ट्र

परळीत बन्सल क्लासेस चालकांकडून सत्यनारायणाच्या नावाखाली शाही पार्टी!

कोरोनाला निमंत्रण देत शेकडो विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ ?

विनोद जिरे

बीड : राज्यात पुन्हा एकदा कोरोणाचा विस्फोट होत असताना, मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळीत कोरोनाचे सर्व नियम (Covid Rules) पायदळी तुडवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरात बन्सल क्लासेसच्या चालकांनी कोरोना नियमांना खो देऊन, सत्यनारायण पूजेच्या नावाखाली चक्क एक प्रकारची शाही पार्टीच केली आहे.

हे देखील पहा :

यावेळी शेकडो विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देत संगीत रजनीच्या माध्यमातून देखील ही पार्टी (Party) थाटली आहे. यावेळी कोरोनाला निमंत्रण देत शेकडो विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ मांडल्याचं पाहायला मिळालं. बीड (Beed) जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने, आज रात्रीपासून दिवसा जमावबंदी तर रात्रीला संचारबंदी लागू होत आहे.

तर, दुसरीकडे विद्यार्थ्यांकडून लाखो हजारो रुपयांचे शुल्क वसूल करून, कोरोना (Corona) नियमांना पायदळी तुडवून परळी (parli) शहरात बन्सल क्लासेस कडून सत्य नारायण पूजेच्या (Satya Narayan Puja) नावाखाली, संगीत रंजणीच्या माध्यमातून शाही पार्टी करण्यात आली. तर यावेळी शेकडो विद्यार्थ्यांसह पालकांची देखील उपस्थिती होती. दरम्यान यामुळे या क्लासेस चालकावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cough Syrup: कफ सिरपनं घेतला आणखी एकाचा जीव; दोन चमचे औषध प्यायल्यानंतर महिलेनं सोडला जीव, रुग्णालयातच घडला धक्कादायक प्रकार

Microwave: मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने होतात 'हे' परिणाम

Shocking : धक्कादायक! दारुच्या नशेत ५ जणांचा घरात घुसून महिलेवर सामूहिक अत्याचार

Dombivli News : डोंबिवलीत खांदेरी-उंदेरी किल्ल्यांची भव्य प्रतिकृती; स्वराज्य ग्रुपचा उपक्रम ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

Gold and Silver: भारतीय सराफ बाजारात होणार भूकंप; सोने-चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण

SCROLL FOR NEXT