Pansare Shivaji Kon Hota book controversy Maharashtra latest news  Saam TV Marathi
महाराष्ट्र

पानसरेंच्या पुस्तकावरून वाद, कार्यकर्त्यांची धरपकड; संजय गायकवाडांची मुजोरी कायम

Govind Pansare books controversy: बुलढाण्यात पानसरे यांच्या 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकावरून वाद पेटला असून कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली आहे.

Namdeo Kumbhar

बुलढाण्यात कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पानसरेंच्या पुस्तकाचं सामुहिक वाचून करून आमदार संजय गायकवाडांचा निषेध केला...मात्र आंदोलन होऊनही गायकवाडांनी पानसरेंच्या पुस्तकाचा विरोध कायम ठेवलाय... त्यामुळे गायकवाडाचं नेमकं काय सुरु आहे? पानसरेंच्या पुस्तकावरून फडणवीसांनी गायकवाडांना कशी तंबी दिलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

कॉ. गोविंद पानसरे यांनी 37 वर्षांपूर्वी लिहिलेलं 'शिवाजी कोण होता?' हे पुस्तक सध्या वादाचं कारण ठरलयं...एकीकडे समाजमाध्यमावर गायकवाडांच्या नावे पानसरेंवर मरणोत्तर गुन्हा दाखल करण्याची पोस्ट व्हायरल झाली... आणि दुसरीकडे कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी थेट गायकवाडांच्या घराजवळील जिजामाता स्टेडियमवर पुस्तकाच्या वाचनासाठी ठाण मांडलं... मात्र पुस्तक वाचनावेळी शिवाजी असा एकेरी उल्लेख केल्यास घडणाऱ्या गोष्टीची जबाबदारी आयोजकांनी घ्यावी, अशी थेट धमकी गायकवाडांनी दिली...तर दुसरीकडे प्रशांत आंबींनीही पुस्तकात लिहलेलचं वाचलं जाणार असं म्हणत गायकवाडांना प्रतिआव्हान दिलं...

दरम्यान बुलढाण्यातील राजकीय वातावरण तापल्यानं पोलिसांनी प्रशांत आंबींना नोटीस देत...स्थानबद्ध केलं.. तर दुसरीकडे आंदोलनस्थळावरून कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं...

मात्र आंदोलन होऊनही गायकवाडांची मुजोरी काही कमी झाली नाही... पानसरेंच्या पुस्तकांतील 'शिवाजी' या एकेरी उल्लेखावर आक्षेप कायम ठेवत त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे या पुस्तकातील शब्द बदला अशी मागणी केली...मात्र फडणवीसांनी हा वाद निरर्थक असल्याचं सांगून गायकवाडांनाच तंबी दिलीय...

दरम्यान गायकवाडांच्या विरोधानंतर राज्यात या पुस्तकाची मागणी प्रचंड वाढलीय. गेल्या 4 दिवसांत तब्बल 10 हजार प्रतींची विक्री झाली असून, प्रकाशकांना पुन्हा छपाई सुरू करावी लागलीय. म्हणजेच, ज्या पुस्तकाला रोखण्याचा प्रयत्न झाला, तेच पुस्तक आता घराघरात पोहोचू लागलयं...खरतर विचारांची लढाई विचारांनी लढण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे... मात्र कुणी जाणीवपूर्वक ठोकशाहीनं राबवत असेल तर त्याला जसेच्या तसे उत्तर देणं गरजेचं असतं... म्हणून महाराजांच्या पुस्तकांवरून राजकारण करणारे हे लोकप्रतिनिधी आहेत की समाजकंटक?

संजय जाधव, साम टिव्ही न्यूज, बुलढाणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Tourism : सुट्टीमध्ये करा पुणेकरांच्या आवडत्या वीकेंड डेस्टिनेशनची सफर, 'हे' ठिकाण पावसाळ्यात मन मोहून टाकते

Brain Tumor Symptom: हे 1 सायलेंट लक्षण दिसलं तर समजा मेंदूमध्य तयार होतोय ट्यूमर

Maharashtra News Live Update: पुण्यात कॉक्रोज जनता पार्टीचं आंदोलन

Tuesday Horoscope : रोमॅंटिक दिवस जाईल, ५ राशींचे भाग्य उजळणार, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

आंध्र प्रदेशातील स्टील प्रकल्पात मोठा स्फोट; ८ मजुरांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT