रोहित पवारांचे राज ठाकरेंना 'हे' प्रत्युत्तर  Saam Tv
महाराष्ट्र

रोहित पवारांचे राज ठाकरेंना 'हे' प्रत्युत्तर

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उदयानंतर राज्यात जातीपातीच्या राजकारणाला उत आल्याचा गंभीर आरोप काल राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत केला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - ''राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) स्थापनेनंतर लगेच लोकांनी डोक्यावर घेतलेल्या या पक्षाला खाली आणायचं असेल तर एकच पर्याय होता, तो म्हणजे जातीयवाद (Casteism) वाढवणं! म्हणून विरोधकांनी विकासाऐवजी जाती-धर्माच्या नावावर समाजात ताण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असाच राज साहेबांच्या बोलण्याचा अर्थ निघतोय!'' अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

राज ठाकरे काल पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान काल त्यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर घणाघाती आरोप केले. १९९९ आधीही देशात जातीपाती होत्या पण, १९९९ नंतर राज्यात जातीपातीचं राजकारण सुरु झाल. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जातीपातीतील द्वेष जास्त वाढला. राष्ट्रवादीच्या उदयानंतर जातीपातीचा द्वेष सुरू झाला', असा घणाघाती आरोप राज ठाकरे यांनी केला होता. या आरोपाला रोहित पवारांनी ट्विट करत त्याच भाषेत उत्तर दिले आहे.

राज ठाकरेंसह रोहित पवारांनी भाजपावर देखील निशाना साधला आहे. ''राज ठाकरे साहेब हे अद्भूत वक्तृत्व शैली असलेले नेते आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात 'लाव रे तो व्हिडिओ...' च्या वादळी सभांमुळं उडालेली धूळ डोळ्यात गेल्याने भाजपचे भले-भले नेते अजूनही डोळे चोळतायेत. त्यामुळं त्यांच्या प्रत्येक शब्दाला एक वेगळा अर्थ असतो, असेही त्यांनी म्हटले आहे.

तसेच, अनेक अडचणी असताना सर्व मंत्री व प्रशासनाच्या सोबतीने चांगलं काम सुरू असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लोकप्रियतेत देशात टॉप 5 मध्ये तर देशात 13 राज्यांत सत्तेत असलेल्या भाजपचा एकही मुख्यमंत्री टॉप 5 मध्ये नाही. टॉप 10 मध्ये आहेत तेही फक्त दोघेजण, असा टोलाही त्यांनी भाजपाला लगावला आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐन निवडणुकीत महायुती सरकारला मोठा धक्का; लाडकी बहीण योजनेचे पैसे रखडले, कारण काय?

अजितदादांच्या जाहीरनाम्यात मेट्रो प्रवास मोफत, फडणवीसांनी उडवली दादांची खिल्ली

रवींद्र चव्हाण पडले मौलवींचे पाया? मौलवी भाजपच्या सभेत?

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंचे 'कॅन्डिडेट बॉम्ब'; १५ कोटींची ऑफर नाकारणारे उमेदवार स्टेजवरच आणले

Maharashtra Live News Update : विमानतळावर गरबा खेळला, पण गणपतीत ढोल-लेझीम वाजले नाहीत- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT