Rohit Pawar raises serious questions over DGCA findings and demands FIR against VSR Aviation in Ajit Pawar aircraft controversy. Saam Tv
महाराष्ट्र

अजितदादांना खराब विमान का दिलं? पवारांचा डीजीसीएला सवाल

Rohit Pawar Questions Dgca Over Ajit Pawar: DGCA ने निष्काळजीपणावर बोट ठेवल्यानंतरही व्हीएसआर कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला नाही.... त्यामुळे याविरोधात पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झालीय...मात्र रोहित पवारांनी पोलीस, व्हीएसआर कंपनी आणि डीजीसीएवर काय आरोप केलेत...आणि त्याला सीआयडीनं काय उत्तर दिलंय...

Bharat Mohalkar

अजित पवारांच्या मृत्यू प्रकरणी डीजीसीएनं व्हीएसआर कंपनीच्या विमान उड्डाणांवर बंदी घातली...त्यासाठी कारण दिलंय विमानांची देखभाल आणि सुऱक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी.... आता डीजीसीएनं कारवाईचा बडगा उगारल्यानंतरही व्हीएसआर कंपनीवर गुन्हा दाखल केला जात नाही.... त्यातच पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी हा मुद्दा थेट विधानपरिषदेत उपस्थित केलाय..

दुसरीकडे रोहित पवारांनीही आधी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन आणि त्यानंतर बारामतीत जाऊन फक्त व्हीएसआरच नाही तर डीजीसीएच्या अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय... यावेळी बारामती पोलीस ठाण्यातही रोहित पवार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झालीय... त्यानंतर व्हीएसआर कंपनीवर गुन्हा दाखल करण्यास बारामती पोलिसांनीही नकार दिलाय..

आता रोहित पवार व्हीएसआरवर गुन्हा दाखल करत असल्याचं समोर आल्यानंतर त्यांना काऊंटर करण्यासाठी सीआयडीची चांगलीच धावाधाव झालीय...एवढंच नाही तर निष्कर्षापर्यंत पोहोचल्यानंतरच या प्रकरणी गुन्हा दाखल कऱण्यात येईल, अशी भूमिका सीआयडीनं मांडलीय.. हे असं असलं तरी कोणत्या मुद्द्यांच्या आधारे व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करता येऊ शकतो...

विमान देखभाल आणि सुरक्षा मानकात DGCAला त्रुटी आढळल्यानं निष्काळजीपणाबद्दल कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. धोकादायक उड्डाण प्रकरणी विमान कंपनीवर गुन्हा दाखल होऊ शकतो. विमान खराब असतानाही उड्डाण घेतल्यानं गुन्हेगारी कटाच्या संशयावरुन BNS कलम 61 नुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. विमान उड्डाण योग्य नसतानाही उडवल्यास फसवणुकीचा गुन्हा दाखल करता येतो

आता डीजीसीएनंच व्हीएसआर कंपनीकडे बोट दाखवलंय... मात्र त्यानंतरही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्यानं या प्रकरणी संशयाचं धुकं आणखीच गडद होतंय.. त्यामुळे खुद्द मुख्यमंत्री रोहित पवारांच्या भेटीनंतर काय कारवाईचे आदेश देतात... याकडे राज्याचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT