Rohit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Rohit Pawar: 'फक्त 'त्या' मतांसाठीच राहुल शेवाळेंनी AU चा मुद्दा काढला; रोहित पवारांनी सांगितले कारण

लोकसभेत राहुल शेवाळे कधीही बोलत नाहीत. आता बोलून बोलून बोलले? निदान महाराष्ट्राचे प्रश्न तरी मांडायचे, असेही रोहित पवार म्हणाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sushant Singh Rajput Case: अभिनेता सुशांत सिंग राजपुत प्रकरणाने राज्याचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. लोकसभेत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य आणि उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप करत या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली आहे.

आदित्य ठाकरेंच्या नंबरवरुन रिया चक्रवर्तीला ४४ कॉल गेले होते असा गंभीर आरोप राहुल शेवाळे यांनी केला आहे. यावर राष्ट्रवादीचे (NCP) आमदार रोहित पवार यांनी राहुल शेवाळेंनी आत्ताच हा विषय का काढला? असा सवाल उपस्थित केला आहे.

याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, "काही दिवसांपूर्वी बिहार निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून सुशांत सिंगच्या मृत्यूचे राजकारण केले. त्यानंतर आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बिहारी मते मिळवण्यासाठी हा मुद्दा पुन्हा समोर आणला जात आहे. या लोकांना फक्त आणि फक्त राजकारण करायच आहे."

याबद्दल पुढे बोलताना रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले की, "राहुल शेवाळे लोकसभेत कधीही बोलत नाहीत. आता बोलून बोलून बोलले तर काय मोबाईल नं द्या. निदान महाराष्ट्राचे प्रश्न तरी मांडायचे. हे फक्त मुंबई महापालिकेच्या निवडणुकात बिहारच्या लोकांची मते घेण्यासाठी सुरू आहे."

दरम्यान, शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी केलेल्या आरोपानंतर नितेश राणेंनीही आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. यामध्ये त्यांनी "सुशांत सिंग राजपुत प्रकरणात फक्त आदित्य ठाकरेंचेच नाव का येते असा प्रश्न उपस्थित करत या प्रकरणात आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा," अशीही मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : शेअर मार्केट फसवणुकीत चक्क चित्रपट निर्मात्याचा सहभाग

Death : २५ वर्षीय CA ने आयुष्य संपवलं, फुगे फुगवण्याच्या गॅसची नळी तोंडात घातली अन्... तरुणाची अवस्था पाहून पोलिसही हडबडले

Medha Rana: बॉर्डर २ मध्ये झळकणारी मेधा राणा कोण? जाणून घ्या

Pune Rave party Case : प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल, एकनाथ खडसे यांच्याकडून गंभीर आरोप; पुणे पोलीस आयुक्तांकडून स्पष्टीकरण

Raigad : रायगडमध्ये मासेमारी बंदीच्या आदेशाचे उल्लंघन! 38 मच्छिमारांवर कारवाई | VIDEO

SCROLL FOR NEXT