Rohit Pawar addressing a press conference in Delhi, raising serious allegations about the pilot and DGCA in Ajit Pawar’s plane crash case Saam Tv
महाराष्ट्र

मोठी अपडेट! दादांच्या विमानाचा पायलट वैफल्यग्रस्त? पवारांचा दिल्लीतून नवा बॉम्ब

Sumit Kapoor Pilot Controversy Ajit Pawar Plane: रोहित पवारांनी अजितदादांच्या विमानाच्या पायलटबद्दल धक्कादायक दावे केलेत.... मात्र हे आरोप नेमके काय आहेत.... रोहित पवारांनी पायलट सुमीत कपूरबद्दल काय म्हटलंय.... आणि डीजीसीएवरही काय आरोप केलेत..

Bharat Mohalkar

अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल रोहित पवार दररोज हादरवणारे नवनवे दावे करत आहेत... त्यातच आता रोहित पवारांनी थेट दिल्लीतून दादांच्या विमान अपघाताबद्दल नवा बॉम्ब फोडलाय.. 210 कोटींचा विमा असलेलं दादांचं विमान वैफल्यग्रस्त कॅप्टनच्या हाती दिल्याचा आरोपच रोहित पवारांनी केलाय..

खरंतर रोहित पवारांनी याआधीही दादांच्या अपघातग्रस्त पायलट सुमित कपूर यांच्या वर्तवणुकीबद्दल पुरावे देत अनेक प्रश्न उपस्थित केले होते....एवढंच नाही तर सुमित कपूरने याआधीही कशा पद्धतीने चुकीचं वर्तन केलं होतं...त्याचाही पाढा रोहित पवारांनी वाचला...

सुमीत कपूर 2010 आणि 2017 मध्ये उड्डाणाआधीच्या चाचणीत मद्यपान प्रकरणी निलंबित

कंपनीचे मालक कॅप्टन व्ही. के सिंग यांनी उड्डाणापुर्वी तुझे स्टंट मला गोत्यात आणतील, असा मेसेज केला

कॅप्टनच्या गृपवर सूमीत कपूर वारंवार मद्यपान करत असल्याचा उल्लेख

हे आरोप केल्यानंतर बारामती विमानतळावर रनवे 29 मोकळा असतानाही कपूरने रनवे 11 वरच विमान उतरवण्याचा हट्ट का धरला? असा संशय रोहित पवारांनी व्यक्त केला होता.. तर विमान पाडण्यासाठीच त्यात जास्तीचं इंधनही भरल्याचा आरोपही करण्य़ात आला होता.

आता दिल्लीतील पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी डीजीसीएच्या अधिकारी श्वेता सिंह या दिशाभूल करत असल्याचा आरोप केलाय..एवढंच नाही तर या प्रकरणाची चौकशी चोरच करत असल्याची भावनाही रोहित पवारांनी बोलून दाखवलीय.. रोहित पवारांनी दिल्लीतून दादांच्या विमानाच्या पायलटबद्दल खळबळजनक गौप्यस्फोट केल्यानं आता उड्डाणाआधी सुमित कपूरची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून सत्य माहिती समोर येणार की व्हीएसआर कंपनीसोबतच अन्य तपास यंत्रणाही या प्रकरणाकडे कानाडोळा करणार... याकडे लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यातील रस्त्यांवर टोळक्यांची दहशत; १७ वर्षीय मुलावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला

अलिबागच्या समुद्रात उलटली प्रवासी बोट? कुणी लपवला अपघाताचा व्हिडिओ?

अरोरांची राज्यसभेसाठी फिल्डिंग? भुजबळ अस्वस्थ, कोल्हेंचा मोठा दावा

शिवजयंतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा अपमान, भाजपच्या बुचकेंची अरेरावी? राष्ट्रवादीत संतापाची लाट, पाहा VIDEO

संतोष देशमुखांच्या हत्येचा आरोपी कृष्णा आंधळे तीनदा गावात; राजकीय अभय?

SCROLL FOR NEXT