Rohit Pawar addresses the media, raising fresh allegations about surveillance at Baramati Airport before the Dada plane crash. Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar Plane Crash Mystery: दादांच्या अपघातावरून पुन्हा 'संशयकल्लोळ', अपघातापूर्वी बारामती विमानातळाची रेकी

Maharashtra Politics: दादांच्या विमान अपघातवरून आमदार रोहित पवारांनी पुन्हा एकदा खळबळजनक आरोप केलाय... अपघातापूर्वी बारामती विमानतळावर नेमकं काय झालं? रोहित पवारांच्या संशयानं दादांच्या अपघाताचं गूढ कसं वाढलयं...

Suprim Maskar

पायलटची संशयास्पद भूमिका, DGCA चा प्राथमिक अहवाल, ब्लॅक बॉक्सचं सत्य यावरून एक ना अनेक प्रश्न निर्माण करणाऱ्या रोहित पवारांनी पुन्हा खळबळजनक दावा केलाय...दादांच्या विमान अपघातावरून सुरु असलेली गौप्यस्फोटांची मालिका आता थांबयचं नाव नाही...अशातच दादांच्या अपघातापूर्वी बारामती विमानतळाची रेकी झाल्याचा संशय रोहित पवारांनी व्यक्त करत सखोल गुन्हेगारी तपास करण्याची मागणी केलीय....

याआधी एएआयबीच्या 22 पानी अहवालात विमान झाडाला धडकल्याचं नमुद करण्यात आलं होतं...त्यावेळी बारामतीतील स्थानिकांनी अपघातस्थळी कुठलंच मोठं झाड नसल्याचा खुलासा करत संशयाला वाट मोकळी करून दिली होती... अशातच चौथी पत्रकार परिषद घेऊन रोहित पवारांनी बारामती विमानतळाच्या रेकीचा मुद्दा उपस्थित केल्यानं एकच खळबळ माजलीय...आधीच रोहित पवारांच्या पत्रकार परिषदांनी पोलीस यंत्रणा आणि राज्य सरकारवर मोठा दबाव निर्माण केलाय. अशात या 'रेकी' प्रकरणाची चौकशी होणार का? विमानतळावर रेकी कोणी आणि का? याचं सत्य बाहेर येणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलयं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात एकनाथ शिंदेंचं वजन वाढणार? ऑपरेशन टायगर यशस्वी, बक्षीस काय? राज्यात भाजपच्या गोटात अस्वस्थता?

School Timing: रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल; एकाच सत्रात भरणार शाळा

Maha TET: राज्यातील सव्वा २ लाखांहून अधिक शिक्षक देणार ‘TET’ परीक्षा; हॉलतिकीट येथून करा डाऊनलोड

मोठी बातमी! माजी मंत्र्याच्या मुलाला ED कडून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

खासदार फुटीमागे कॉन्ट्रॅक्टर कनेक्शन? 'मराठवाड्यातील कॉन्ट्रॅक्टरनं खरेदी केले खासदार'

SCROLL FOR NEXT