ट्रक चालकासह दोघांचे हातपाय बांधून मारहाण करत २० लाखांची लूट! दिनू गावित
महाराष्ट्र

ट्रक चालकासह दोघांचे हातपाय बांधून मारहाण करत २० लाखांची लूट!

आयसर चालकाचे हातपाय बांधत कापडाच्या 128 गठाणासह सुमारे 20 लाखांची लुट करण्यात आल्याची घटना नंदुरबार-वाकाचार रस्त्यावर घडली आहे. वाहनचालकासह दोघांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर लुट करणारे चौघेही मुद्देमाल घेऊन पसार झाले.

दिनू गावित

नंदुरबार : आयसर चालकाचे हातपाय बांधत कापडाच्या 128 गठाणासह सुमारे 20 लाखांची लुट करण्यात आल्याची घटना नंदुरबार-वाकाचार रस्त्यावर घडली आहे. वाहनचालकासह दोघांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर लुट करणारे चौघेही मुद्देमाल घेऊन पसार झाले. याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील म्हसवे येथील रहिवाशी किशोर संतोष पाटील हे त्यांच्या आयसर ट्रक क्र - एम.एच.18 बी.जी.7347 मध्ये अहमदाबाद येथुन कापडाचा गठाण भरुन अमरावतीकडे निघाले होते.

हे देखील पहा -

आयसर वाकाचार रस्त्यावरुन पुढे नंदुरबार रस्त्यावर आला असता रात्री 1 वाजेच्या सुमारास अज्ञात मालट्रक त्यांच्या आयसर समोर आडवा लावण्यात आला. ट्रक मधील एकाने आईसर चालक वाहनचालक संजय मच्छिंद्र पाटील यांच्या हाथावर खांद्यावर मारहाण केली. त्याचबरोबर गाडी मालक किशोर संतोष पाटील यांचेही हातपाय बांधुन मारहाण करण्यात आली. या चार अज्ञात हल्लेखोरांपैकी एक जण आयसर गाडी चालवून अज्ञात ठिकाणी घेऊन गेला. पुढे काही अंतरावर चौघा अज्ञातांनी आयसरमधील 128 कापडाच्या गठाण आपल्या ट्रकमध्ये जबरीने घेवुन गेले तसेच गाडीमालक किशोर पाटील यांच्या पॅन्टच्या खिशातुन 8500 रुपयांची लुट केली. त्यानंतर गठाणीसह चौघांनीही पोबारा केला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखाचे पोलीस निरिक्षक रविंद्र कळमकर, शहर पोलीस निरिक्षक अर्जुन पटले, उपनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संदिप पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आयसर उपनगर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला. आयसर चालक संजय मच्छिंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरुन चौघा अज्ञातांविरुध्द नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 394, 341, 342, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक संदिप पाटील करीत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut on Bihar election: बिहारमध्ये एकदम महाराष्ट्र पॅटर्न, संजय राऊतांना वेगळाच संशय, पोस्ट व्हायरल

Gold Rate Today: जळगावच्या सराफा बाजारपेठेत सोन्याचे दर घसरले; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

Maharashtra Live News Update: जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील केमिकल कंपनीला आग

Bihar Election Result Live Updates : बिहारमध्ये एनडीएचे द्विशतक, विरोधक ४० आताच

Chapati Vs Bhakri: भाकरी की चपाती, पचनासाठी काय योग्य? वाचा संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT