आर्मी जवानाच्या घरावर दरोडा,१० तोळे सोने लंपास ! दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

आर्मी जवानाच्या घरावर दरोडा,१० तोळे सोने लंपास !

लातूरमध्ये भारतीय सैन्यातील जवानाच्या घरावर दरोडा टाकून १० तोळे सोने, दोन मोबाईलसह अन्य ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दीपक क्षीरसागर

लातूर : सैन्यदलातील जवान घराचा आणि परिवाराचा त्याग करून देशसेवेसाठी आणि देशाच्या रक्षणासाठी सीमेवर कर्तव्य निभावत असतात. मात्र, याच जवानांचे घर सुरक्षित नसल्याची बाब समोर आली आहे. लातूर-नांदेड महामार्गाजवळ घर असणाऱ्या भारतीय सैन्यातील जवानाच्या घरावर दरोडा टाकून १० तोळे सोने, दोन मोबाईलसह अन्य ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला आहे. Robbery at soldier's house

हे देखील पहा -

ही घटना चाकूर तालुक्यातील महाळंगी गावात लातूर-नांदेड महामार्गाजवळ मंगळवारी रात्री २ च्या सुमारास घडली. याची माहिती मिळताच पोलिसांनी पहाटे जिल्ह्यात नाकाबंदी लावली व घटनास्थळी श्वानपथकास पाचारण करण्यात आले. पोलिसांनी दरोडेखोरांना पकडण्यासाठी पथके तैनात केली आहेत. अहमदपूर नजिक पोलिसांनी कार मधील दरोडेखोरांचा पाठलाग केला. तेव्हा दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत कार सोडून पळून जाण्यात यशस्वी झाले.

चाकूर तालुक्यातील महाळंगी येथील सौदागर राजाराम चरक हे सध्या लातूररोड येथे घर बांधून राहतात. चरक हे सैन्यदलात कार्यरत असून आसाम येथे कर्तव्यावर आहेत. ५ जूनला एक महिन्याच्या रजेवर ते गावी आले आहेत. ४ जूलैला परत आसामला जाणार आहेत. मंगळवारी रात्री २ च्या सुमारास घरासमोर चोरटे आल्याची चाहूल चरक कुटूंबियांना लागली.

खिडकीतून बाहेर पाहिले असता बॅटरी घेऊन असलेले लोक दिसून आले. त्यांनी चरक यांच्या कंम्पांउड मधून घराच्या आवारात प्रवेश केला आणि घराच्या मुख्य दरवाजाला धक्के देऊन दरवाजा तोडून आत प्रवेश केला. चरक कुटूंबियांना दोघांनी चाकूचा धाक दाखवून धमकाविले. तर अन्य दोघांनी घरातील एका कपाटातील सोन्याचे दागिने त्यात मिनी गंठण, लॉकेट, झुमके, सरपाळे असे दहा तोळ्याचे दागिने लुटले.

दरोडेखोरांनी चरक व त्यांच्या पत्नीचा मोबाईल घेऊन पोबारा केला. घटना घडताच सौदागर चरक व त्यांचे शेजारी इरफान कोतवाल यांनी चाकूर पोलिसांत जाऊन घटनेची माहिती दिली. पोलिस उपविभागीय अधिकारी विद्यानंद काळे, पोलिस निरिक्षक सोपान सिरसाट घटनास्थळी पहाटे ३च्या सुमारास दाखल झाले. जिल्ह्यात पोलिसांनी नाकाबंदी लावली आहे. पोलिसांची पथके दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अभिजीत दीपके अन् आशुतोष रांका यांना अटक होणार; ट्विटने खळबळ

Chanakya Niti: लग्नाआधी जोडीदार निवडताना या 7 गोष्टी नक्की तपासा; नाहीतर नंतर पश्चात्ताप होऊ शकतो

Kitchen Safety Tips: गॅस- स्टोव्हच्या जवळ 6 वस्तू ठेवणे टाळा, वास्तुशास्तानुसार ठरू शकते घातक

Ginger Tea : रोज आल्याचा चहा पिता? थांबा! ५ गंभीर दुष्परिणाम वाचताच 'ही' सवय सोडाल

Postpartum diet: बाळंतपणानंतर वजन कमी करण्याची घाई नको; आधी शरीराला नेमकं काय हवं ते जाणून घ्या

SCROLL FOR NEXT