Gondia Traffic Saam Tv
महाराष्ट्र

Gondia Traffic Signal News: वाढत्या तापमानामुळे रस्त्यावरील सिग्नल यंत्रणा ठेवणार बंद, काय आहे संबंध? काय कारण असू शकतं?

Gondia Traffic Signal News: गोंदियामध्ये वाहतूक विभागने नागरिकांच्या सोईसाठी उत्तम निर्णय घेतला आहे.

साम टिव्ही ब्युरो

शुभम देशमुख

Gondia News: राज्यात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण बनलं आहे. मात्र कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना कडाक्यांना उन्हाचा भयंकर त्रास सहन करावा लागत आहे.

उन्हापासून संरक्षणासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात येत आहे. मात्र गोंदियामध्ये वाहतूक विभागने नागरिकांच्या सोईसाठी उत्तम निर्णय घेतला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रसह गोंदिया जिल्ह्यातही सातत्याने तापमान वाढत आहे. गोंदिया जिल्ह्यातील तापमान सध्या 42 अंशावर पोहोचलं आहे. यामुळे नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत.  (Latest Marathi News)

सिग्नल यंत्रणा बंद ठेवण्याचा निर्णय

अशातच गोंदियाच्या वाहतूक विभागाने दुपारी 1 ते 4 वाजेच्या दरम्यान गोंदिया शहरातील सर्वच ट्राफिक सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उन्हापासून नागरिकांचा बचाव व्हावा याकरिता हे सिग्नल बंद राहणार आहेत.  (Breaking News)

सिग्नल यंत्रणा बंद ठेवण्याचा फायदा?

ट्रॅफिक सिग्नलवर नागरिक थांबल्याने त्यांना अधिकचा वेळ उन्हात घालवावा लागतो. आधीच वाढलेलं तापमान त्यामुळे उन्हाच्या तीव्र झळा जाणवतात. सिग्नलवरील गाड्यांच्या गर्दीत उष्णता आणखी वाढते. यामुळे नागरिकांचा तीव्र उष्णतेपासून काहीसा बचाव व्हावा आणि उन्हातील त्यांचा प्रवास कमी वेळेत संपावा यासाठी वाहतूक विभागाने हा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई इंडियन्सच्या संघात होणार मोठा बदल; कोण बनणार MIचा पुढचा कर्णधार? 'या' खेळाडूंच्या नावाची जोरदार चर्चा

Maharashtra News Live Update: पाच हजार रुपयांची मदत म्हणजे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं- नाना पटोलेंचा सरकारवर घणाघात

किचनमधील भांड्यांचा तुमच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम? जाणून घ्या

रात्री नुडल्स खाऊन कुटंब झोपलं अन्....; ५ जणांच्या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट

Monday Horoscope: या 5 राशींचं नशीब पालटणार? अचानक पडणार पैशांचा पाऊस

SCROLL FOR NEXT