Saam Tv
स्वयंपाकघरात वापरल्या जाणारी कोणती भांडी सर्वात सुरक्षित आहेत आणि कोणती आरोग्यासाठी घातक ठरतात, हे जाणून घेऊया.
टिफिन असो किंवा बाहेरून खाद्यपदार्थ पॅक करून आणणे असो, प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. प्लास्टिकच्या भांड्यात अन्न वारंवार गरम केल्याने मायक्रोप्लास्टिक आणि हानिकारक रसायने अन्नात मिसळू शकतात, जे आरोग्यासाठी अत्यंत घातक आहेत.
अन्न शिजवण्यासाठी आणि रोजच्या वापरासाठी स्टीलची भांडी सर्वात उत्तम मानली जातात. ही भांडी दीर्घकाळ टिकतात आणि कोणत्याही अन्नासोबत रासायनिक प्रक्रिया करत नाहीत.
बोरोसिलिकेट ग्लास रासायनिकदृष्ट्या स्थिर असते. त्यामुळे यातून अन्नात कोणतीही रसायने मिसळत नाहीत. स्वयंपाक करणे, मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करणे आणि अन्न साठवून ठेवण्यासाठी काचेची भांडी सर्वोत्तम आहेत.
डोसा, ऑम्लेट किंवा धिरडे बनवण्यासाठी कास्ट आयर्नच्या तव्याचा वापर केला जातो. ही भांडी अतिशय दणकट असतात आणि अन्नातील आयर्नचे प्रमाण वाढवतात.
सामान्यत: सिरॅमिकची भांडी वापरण्यासाठी सुरक्षित मानली जातात. मात्र, हलक्या किंवा खराब गुणवत्तेच्या सिरॅमिक भांड्यांच्या ग्लेज्ड कोटिंगमध्ये कॅडमियम किंवा लेड सारखे घातक घटक असण्याची शक्यता असते.
ॲल्युमिनियमच्या भांड्यात आंबट किंवा जास्त मीठ असलेले पदार्थ शिजवल्यास ॲल्युमिनियम अन्नात विरघळून रक्तात जाऊ शकते. ॲनोडाइज्ड ॲल्युमिनियममध्ये हे प्रमाण कमी असते.
सामान्य तापमानावर यात स्वयंपाक करणे ठीक आहे, परंतु अतिप्रमाणात तापवल्यास यातून विषारी धूर व कण बाहेर पडतात. नॉन-स्टिक कोटिंग खराब झाली असेल किंवा खरचटली असेल तर अशी भांडी लगेच बदलावीत.
NEXT : ॲल्युमिनियमची काळी कढई पुन्हा चमकेल नव्यासारखी! वापरा 'या' सोप्या ट्रिक्स