तहसीलदार ज्योती देवरेंची बदली करा; पारनेर तालुका महसूल आणि तलाठी संघटनेची मागणी! SaamTV
महाराष्ट्र

तहसीलदार ज्योती देवरेंची बदली करा; पारनेर तालुका महसूल आणि तलाठी संघटनेची मागणी!

एक तर तहसीलदार ज्योती देवरे यांची बदली करा नाहीतर आमची बदली करा अशी पारनेर तालुका महसूल कर्मचारी आणि तलाठी संघटनेच्यावतीने मागणी केली आहे.

सचिन आगरवाल

अहमदनगर : अहमदनगर Ahmednagar जिल्ह्याच्या पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे Jyoti Deore यांच्या विरोधात पारनेर तालुका महसूल कर्मचारी Revenue staff आणि तलाठी संघटनेच्यावतीने बेमुदत काम बंद आंदोलन सुरू झाले आहे. एक तर तहसीलदार ज्योती देवरे यांची बदली करा नाहीतर आमची बदली करा अशी मागणी संघटनेने केली आहे.Replace Tehsildar Jyoti Deore

हे देखील पहा-

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ क्लिपमुळे Audio clip त्या चर्चेत आल्या होत्या लोकप्रतिनिधींच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करणार असल्याचं त्यांनी त्यांच्या त्या क्लिप मध्ये म्हंटल होत यामुळे पारनेर मतदार संघाचे आमदार निलेश लंके MLA Nilesh Lanke आणि पारनेर चा तहसीलदार यांच्यामधील वाद शांत होत नाही तोच महसूल कर्मचारी आणि तलाठी संघटनेने तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विरोधात बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केल्याने ज्योती देवरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

पारनेर च्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्याविरोधात त्या दडपशाही आणि हुकूमशाही करत असल्याची तक्रार दोन्ही संघटना ने वरिष्ठांकडे केली होती एक वर्ष होऊनही कुठलीही कारवाई न झाल्याने शेवटी आज संघटनेने बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे जोपर्यंत आमच्या मागण्यांवर निर्णय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

तसेच आपल्या कीर्तनातील वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे इंदुरीकर महाराज यांनी देखील आमदार निलेश लंके आयोजित कीर्तन कार्यक्रमामध्ये ज्योती देवरे यांचे नाव न घेता टीका केली होती त्यामुळे कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणाऱ्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे.दरम्यान पारनेर तालुका महसूल आणि तलाठी संघटनेच्या मागणीनुसार ज्योती देवरे यांची बदली होणार कि नाही हे येत्या काळामध्ये कळेल.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जळगावच्या अमळनेर तालुक्यातील जैतपिर गावात पिकअप व्हॅन उलटून ११ जण जखमी

Nakshatra Gochar: मंगळ आणि शुक्राच्या गोचरमुळे बदलणार ४ राशींचे भाग्य; घरात येणार धन-दौलत अन् सूख-समृद्धी

Matka Water: उन्हाळ्यात माठातलं पाणी पिताय? चुकीच्या पद्धतीमुळे पडाल आजारी, लक्षात ठेवा ही १ गोष्ट

Pune News: पुण्यात खळबळ! नामांकित शिक्षण संस्थेत विद्यार्थ्याचा मृत्यू, बास्केटबॉलचा स्टँड अंगावर कोसळला

Gold Rate: सोन्याच्या दरात 3,666 रुपयांनी वाढ; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT