Sakshi Sunil Jadhav
उन्हाळा सुरु झाली की सगळ्यांना माठातलं पाणी प्यायला हवं असतं. कारण त्याने लगेच तहान जाते.
उन्हाळ्यात बऱ्याच घरांमध्ये माठ वापरला जात असेल तरी, त्याची स्वच्छता कशी करतात? हे अनेकांना माहितच नसतं.
जर तुम्ही नीट स्वच्छता केली नाही तर हेच पाणी दूषित होऊन आजारांना आमंत्रण देऊ शकतं.
मटक्याच्या मातीमध्ये छोटी छिद्र असतात. साबण किंवा डिटर्जेंट वापरल्यामुळे त्यातले केमिकल्स मडक्यात शोषले जाऊन पाण्यात मिक्स होऊ शकतात.
नवीन माठ किमान 24 तास पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे त्यातील छिद्र बंद होतात आणि पाणी गळत नाही.
माठ आतून चांगला घासून स्वच्छ करा आणि पूर्णपणे उन्हात वाळवा. यामुळे बॅक्टेरिया कमी होतात.
माठातील पाणी 2–4 दिवसांपेक्षा जास्त ठेवू नका. जास्त दिवस ठेवल्याने पाणी खराब होऊन त्यात काई किंवा लहान किडे (इल्ल्या) तयार होऊ शकतात.
साबणाऐवजी मीठ किंवा बेकिंग सोड्याने माठ घासून साफ करा. हा सुरक्षित आणि प्रभावी उपाय आहे.