Sakshi Sunil Jadhav
वजन कमी करायचं असेल तर सगळ्यात आधी तुमच्या नाश्त्यात बदल करणं गरजेचं आहे. कारण काही पदार्थ हे तुमच्या नकळत तुमच्या शरीरातला फॅट वाढवत असतात.
कॉर्नफ्लेक्स किंवा चॉकलेट सीरिअल्समध्ये साखर जास्त असतं. यामुळे लवकर भूक लागते आणि वजन कमी होण्याऐवजी वाढायला लागतं.
अनेक घरांमध्ये केला जाणाऱ्या व्हाईट ब्रेड आणि बटरमध्ये फायबर कमी असतं. त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटत नाही. बटरमुळे जास्त कॅलरीज वाढतात.
जास्त तेलात बनवलेले पदार्थ वजन वाढवतात. जसं की, पोहे, भजी, वडे हे पचायलाही जड असतात.
बाजारामध्ये मिळणाऱ्या ज्यूसमध्ये साखर आणि प्रिझर्वेटिव्ह्स जास्त असतात. हे आरोग्यासाठी जास्त हानिकारक ठरू शकतं.
केक, पेस्ट्री आणि बिस्किट्स यामध्ये मैदा आणि साखर मोठ्या प्रमाणात असतं. रोजच्या सेवनाने वजन झपाट्याने वाढू शकतं.
फ्लेवर्ड दह्यामध्ये साखर जास्त असते. याऐवजी साधं दही खाणं जास्त फायदेशीर आहे.
एनर्जी ड्रिंक्समध्ये कॅफिन आणि साखर जास्त असते. यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढू शकतं.
साखरेचा चहा किंवा कॉफीमुळे जास्त कॅलरीज मिळतात. वजन कमी करायचं असल्यास साखर कमी करा किंवा टाळाच.