relif to bacchu kadu faction in amravati district cooperative bank  saam tv
महाराष्ट्र

Amravati DCC Bank : अमरावती जिल्हा बँकेत पुन्हा बच्चू कडूंची सरशी, संचालकांवरील अपात्रता टळली

Bacchu Kadu Latest Marathi News : आमदार बच्चू कडू यांच्या गटाच्या संचालकांच्या विराेधात अन्य संचालक एकवटले हाेते. परंतु त्यांना त्यात यश आले नाही.

Siddharth Latkar

- अमर घटारे

Amravati News :

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (amravati district cooperative bank) सत्ताधारी गटातील पाच संचालकांच्या विरोधात मांडण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव विभागीय सहनिबंधकांनी फेटाळला आहे. या निर्णयामुळे अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू (mla bacchu kadu) यांना व त्यांच्या गटाला दिलासा मिळाला आहे. (Maharashtra News)

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्ताधारी गटातील पाच संचालकांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यासाठी विशेष सभा बोलण्यात यावी अशी मागणी करण्यात आली हाेती. त्यासाठी 14 संचालकांच्या स्वाक्षरीचे पत्र विभागीय सहनिबंधकांना देण्यात आले हाेते. यामुळे अमरावती जिल्हा बँकेत सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा कलगीतुरा पुन्हा रंगण्याची चिन्ह निर्माण झाली हाेती.

दरम्यान विभागीय सहनिबंधकांनी अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पाच संचालकावरील अविश्वास फेटाळला आहे. त्यानूसार संचालक नरेशचंद्र ठाकरे, जयप्रकाश पाटील, आनंदकुमार काळे, अजय मेहकरे, आणि चित्रा डहाणे यांना दिलासा मिळाला आहे. हे सर्व संचालक बँकेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या गटाचे आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाचही संचालकांवरील प्रत्येक आरोपाची पडताडणी करून अहवाल देण्यात आला आहे. आता विरोधी गटाच्या दोन संचालकावर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी सत्ताधारी गट न्यायालयात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: औरंगाबादमध्ये हत्याकांड! तरुणाला पकडून हातपाय बांधले, नंतर टोळक्यांनी क्रूरपणे संपवलं, भलतंच कारण समोर आलं

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये पर्यावरण प्रेमींनी घेतली राज ठाकरे यांची भेट

Horoscope Saturday: व्यवसायात होणार भरभराट, ५ राशींसाठी सुखाचा दिवस; वाचा शनिवारचे राशीभविष्य

लाडक्या बहि‍णींसाठी मोठी अपडेट; मकर संक्रांतीच्या दिवशी ३००० रुपये होणार बँक खात्यात जमा? महत्वाची माहिती समोर

आंदोलकांचा इराणच्या राजधानीवर कब्जा, अनेक सरकारी कार्यालयं आंदोलकांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT