पुण्यातील मारहाण प्रकरणानंतर रेखा कोंडे यांच्यावर पक्षाची कारवाई
ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या पुणे शहराध्यक्ष रेखा कोंडे चर्चेत
रेखा कोंडे मारहाण प्रकरणी चार महिलांविरोधात गुन्हा दाखल
सचिन जाधव, साम प्रतिनिधी
पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आवारात झालेल्या मारहाण प्रकरणानंतर ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या पुणे शहराध्यक्षांवर कारवाई करण्यात आलीय. महिला आघाडीच्या पुणे शहराध्यक्ष रेखा कोंडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. गेल्या काही दिवसांपासून त्या विविध कारणांमुळे चर्चेत होत्या. पुण्यातील मारहाणीनंतर पक्षाकडून कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. मात्र, हकालपट्टीच्या कारवाईमागील अधिकृत कारण आणि पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णयाचा तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाहीये.
20 नोव्हेंबर रोजी टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या परिसरात पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर रेखा कोंडे यांना मारहाण झाली होती. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुणे शहराध्यक्षा आरती मारणे-पवार आणि त्यांच्यासोबतच्या महिलांनी मारहाण केल्याचा आरोप कोंडे यांनी केला होता. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात चार महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
रेखा कोंडे या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर सोशल मीडियातून सातत्याने व्यक्त होत होत्या. त्यांच्या भूमिकेवरून आरती मारणे यांच्याशी वाद निर्माण झाला होता. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. कोंडेंच्या हकालपट्टीमुळे पुण्यातील ठाकरे गटाच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
माझी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकलपट्टी केल्याच कुठलाही पत्र दिले नाही किंवा सांगण्यात आलं नाही. शिवसेनेचे वृत्तपत्र सामना यामध्ये पक्षविरोधी कारवाई केल्याने माझे हकलपट्टी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सामना वृत्तपत्रात माझी हकलपट्टी करण्यात आल्याचं छापण्यात आला आहे. मात्र मराठवाड्यात शिवसेना ठाकरेचा आमदार पाडणारे मनोज जरांगे शिवसेनेला निष्ठावंत वाटतो आहे का? खरंतर पक्षविरुद्ध कार्य हे अशा लोकांनी केला आहे असं सांगत सुषमा अंधारे यांचा फोटो रेखा कोंडे यांनी दाखवला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.