कोल्हापूर : शिवसेनेने (Shivsena) संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेना पुरस्कृत राज्यसभेची उमेदवारी देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण संभाजीराजे यांनी हा प्रस्ताव नाकारत आपण या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर संभाजीराजे यांनी आरोप केले होते. उद्धव ठाकरेंनी छत्रपती घराण्याचा अपमान केल्याचे आरोप झाले. या आरोपाला आज श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी प्रत्युत्तर दिले. छत्रपती घराण्याचा सर्व राजकीय पक्षीयांनी सन्मान केला असून कुणीही अवमान केलेला नाही, असं शाहू महाराज छत्रपती म्हणाले.
संभाजीराजे (Sambhaji Raje Chhatrapati) यांना उमेदवारी नाकारली याच्याशी घराण्याचा संबंध आला नाही. त्यांना व्यक्तिगत उमेदवारी नाकारली आहे. संभाजीराजे यांच्या राज्यसभेवर जाण्याच्या हालचाली जानेवारी महिन्यापासून सुरू होत्या. त्याचवेळी त्यांना आपली भूमिका स्पष्ट करायला अवधी होता. शेवटच्या टप्प्यात त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांना कदाचित तुम्ही अपक्ष म्हणून उभारा आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो आणि महाविकास आघाडीचाही पाठिंबा घ्या, असा सल्ला मिळाला असेल. पण त्यात कितपत तथ्य आहे हे मला माहिती नाही. फडणवीस यांच्यासोबत महाविकास आघाडीच्या नेत्यांचीही त्यांनी भेट घेणे अपेक्षित होतं. पण त्यांनी तसे केले नाही, असंही शाहू महाराज छत्रपती म्हणाले.
आमच्यात काही विचार विनमय झाला असता, किंवा मी सहमती दिली असती, नसती पण तसं काही झालं नाही. ते छत्रपती घराण्याचा निर्णय वैगेरे वेळोवेळी सांगत आले, पण त्यांचे निर्णय हे सगळे व्यक्तिगत होते, असंही शाहू महाराज छत्रपती म्हणाले. २००९ सालापासून संभाजीराजे यांनी वाट वेगळी पकडली आहे. भाजपने (BJP) त्यांना दिलेल्या खासदारकीला माझा विरोध होता पण शेवटी लोकशाही आहे. त्यावेळी देखील चर्चा झाली नाही. त्यांनी निर्णय घेतल्यानंतर मला सांगितलं होतं, असंही शाहू महाराज छत्रपती म्हणाले.
संभाजीराजे (Sambhaji Raje Chhatrapati) यांना पाठिंबा पाहिजे होते तर इतर नेत्यांकडेसुद्धा जाणं गरजेचं होतं. तसा प्रयत्न केला पाहिजे होता. राज्यसभेसाठी गणित जुळवून आणता पक्ष घोषित करणं हा निर्णय चुकला. ज्यांच्याकडे मत जास्त आहेत त्यांच्याकडे ते अप्रोच झाले नाहीत. शेवटी लोकशाही आहे, त्यात काय चालते हे सगळ्यांना माहित आहे. कुठं घोडं अडतंय हे त्यांना माहित असायला पाहिजे होतं, असंही शाहू महाराज छत्रपती म्हणाले.
स्वराज्य पक्ष स्थापन करणार आणि इकडे राज्यसभा मिळवणार. स्वराज्य पक्ष स्थापन करायचा होता तर तुम्हाला कुणाकडे जायची गरज नव्हती. राज्यसभा पाहिजे होती तर भाजपला भेटला तर महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटायला पाहिजे होतं. दोन ते तीन महिन्यापासून ही प्रक्रिया सुरु करायला पाहिजे होती. त्यांनी या प्रक्रियेला खूप उशीर केला. कोणत्याही पक्षात गेलं की बंधने आलीच. तुम्ही जर स्वराज्य पक्ष मोठा केला तर एक राज्यसभा कशाला चार राज्यसभा मिळतील. मी शिवसेनेत गेलो होतो. तेव्हा विक्रमसिंह यांच्यासाठी आम्ही प्रचार केला होता.
संभाजीराजे (Sambhaji Raje Chhatrapati) फडणवीस यांना भेटून आल्यानंतर लगेल घोषणा केली. हे लिंक केलं पाहिजे. आपण घोषणा केल्यानंतर सगळे आपल्याकडे धावून येतील पाठिंब्यासाठी हे कॅल्कूलेशन चुकलं आहे. राजकारणामध्ये असं एकदम होत नाही. विचार विनिमय अनेक प्रकारचे असतात, असंही शाहू महाराज छत्रपती म्हणाले.
Edited By- Santosh Kanmuse
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.