Taliye | तळीये ग्रामस्थांचे लवकरच पुनर्वसन  वैदेही काणेकर
महाराष्ट्र

Taliye | तळीये ग्रामस्थांचे लवकरच पुनर्वसन

तळीये ग्रामस्थांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव तयार असून लवकरच ६० घरांचे पुनर्वसन नवीन जागी करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Krushnarav Sathe

महाड : अतिवृष्टीमुळे दरड कोसळून महाड येथील तळीये गावात मोठी दुर्घटना झाली होती. या गावातील ग्रामस्थांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव तयार असून लवकरच ६० घरांचे पुनर्वसन नवीन जागी करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महाड येथे दिली. ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्याकडून तळिये येथील दुर्घटनाग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी तळीये येथे भेट दिली. तसेच महाड सत्र न्यायालयाच्या इमारत दुरुस्तीकरता ५० लाख रुपयांचा निधी देण्याची देखील घोषणा त्यांनी केली आहे.

हे देखील पहा -

प्रलयकारी पावसाने तळीये गावात दरड कोसळून ८५ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या गावांचे पुनर्वसन करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावाप्रमाणेच तळीये येथील नागरिकांचे लवकरात लवकर पुनर्वसन करण्याची मागणी या अनुषंगाने होत होती.

ज्या डोंगराचा भाग कोसळून तळीये दुर्घटना घडली त्याच डोंगराच्या दुसरीकडील भागालासुद्धा भेगा पडल्या असल्याची माहिती यावेळी ग्रामस्थांनी शिंदे यांना दिली. ही भेग तब्बल तीन किलोमीटर पर्यंत लांब असल्यामुळे या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शिंदे आवड, कुम्हण अळी, खालचे आवाड, मधले आवाड आणि तळीये म्हणजेच कोंडाळकर आवाड अशा पाच वाड्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

महाड सत्र न्यायालयाच्या इमारत दुरुस्तीसाठी ५० लाखांचा निधी :

महाड मधील सत्र न्यायालयाच्या इमारतीचे देखील या पुरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पुरामुळे नदीलजवळील कोर्टाची इमारत पाण्याखाली गेल्याने आतील दालने व फर्निचरचे मोठे नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यात कोर्टातील कागदपत्रेही पाण्याखाली होती. नगरविकास मंत्री शिंदे यांनी या इमारतीला भेट देऊन पाहणी केली असून खराब झालेल्या साहित्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करून इमारतीतून कामकाज पुन्हा सुरु व्हावे, यासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून ५० लाख रुपयांचा विशेष निधी देण्याची देण्यात येणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress: 'बिडी-बिहार'च्या पोस्टनं राजकारण तापलं; वादानंतर काँग्रेसचा माफीनामा

Hair Care Tips: हे 'काळे पाणी' तुमच्या केसांच्या सर्व समस्या करतील मूळापासून दूर, एकदा नक्की ट्राय करुन पाहा

Mumbaicha Raja : 'मुंबईचा राजा...' म्हणू नका! रोहित शर्मानं चाहत्यांना रोखलं, VIDEO

Weight Gain : जेवणाच्या या चुकीच्या सवयींमुळे वाढेल वजन; वेळीच व्हा सावध

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

SCROLL FOR NEXT