बांधकाम नियमित करा अन्यथा बांधकामावर हातोडा- आयुक्त मित्तल दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

बांधकाम नियमित करा अन्यथा बांधकामावर हातोडा- आयुक्त मित्तल

मालमत्ता धारकांनी प्रतिसाद दिला नसल्याने अखेर महानगरपालिका आयुक्त अमन मित्तल यांनी काही दुकाने सील केली तर अनाधिकृत दुकानावर बुलडोझर चालवून उध्वस्त करण्याची कारवाई केली आहे.

दीपक क्षीरसागर

दीपक क्षीरसागर

लातूर : लातूर Latur शहरातील अतिक्रमण करून अनेकांनी बांधकामे केली आहेत. या सर्व नागरिकांना महानगरपालिकेने MC बांधकाम नियमित करून घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या. पण त्यास मालमत्ता धारकांनी प्रतिसाद दिला नसल्याने अखेर महानगरपालिका आयुक्त अमन मित्तल Aman Mittal यांनी काही दुकाने सील केली तर अनाधिकृत दुकानावर बुलडोझर चालवून उध्वस्त करण्याची कारवाई केली आहे.

शहरातील उद्योग भवन परिसरामध्ये संध्याकाळी मोठी कारवाई करत अवैध बांधकाम करून अतिक्रमण केलेले दुकाने या सर्वांवर बुलडोजर चढवून महानगर पालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. यावेळी स्वतः मनपा आयुक्त अमन मित्तल उपस्थित होते.

लातूर शहरातल्या विलासराव देशमुख मार्गावर अनेक प्रतिष्ठीत नागरिकांनी अतिक्रमण करत अनधिकृत बांधकामे केली होती. यावर लातूरच्या महानगरपालिकेच्या वतीनं सदरची बांधकामे नियमित करून घेण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. पण अनेक नागरिकांनी याकडे दुर्लक्ष केले. आज महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमन केलेल्या जागेमध्ये असलेल्या दुकानांवर कारवाई करत बुलडोजर चढवले. तर काही दुकान व व्यापारी प्रतिष्ठान यांच्या इमारतीला 15 दिवसाची मुदत देऊन सील करण्यात आली आहेत.

शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे लातूर महानगरपालिकेचे आयुक्त अमन मित्तल यांच्या पुढाकाराने आज शहरातील विलासराव देशमुख मार्गावर अतिक्रमण मध्ये असलेल्या दुकानांवर बुलडोजर चढवून कारवाई करण्यात आली. यात खाजगी कोचिंग क्लासेस, किराणा दुकान दवाखाना आदी व्यवसाय या अतिक्रमण केलेल्या इमारतीत सुरू होती. यामुळं अतिक्रमण धारकात मोठी भीती निर्माण झाली आहे. तर लातूर शहर पुन्हा एकदा अतिक्रमण मुक्त होऊन मोकळा श्वास घेईल अशी आशा आता नागरिकांमध्ये आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

Shahaji Bapu Patil : डोंगर-झाडीनं माझं नाव झालंय, इज्जत घालवू नका : शहाजीबापू पाटील

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Maharashtra Election : नाकाबंदी सुरू होती, कारमध्ये सापडलं घबाड, जळगावात २० लाख कॅश पकडली, आतापर्यंत ४ कोटी जप्त

SCROLL FOR NEXT