परीक्षेसाठी काढलेल्या पास चे पैसे परत करा परीक्षार्थ्यांची MSRTC कडे मागणी!
परीक्षेसाठी काढलेल्या पास चे पैसे परत करा परीक्षार्थ्यांची MSRTC कडे मागणी! गजानन भोयर
महाराष्ट्र

#परीक्षांचाधंदाथांबवा : परीक्षेसाठी काढलेल्या पास चे पैसे परत करा परीक्षार्थ्यांची MSRTC कडे मागणी!

गजानन भोयर, साम टीव्ही वाशिम

वाशिम : महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने 25 व 26 सप्टेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेअगोदरच कालपासून मोठा गोंधळ उडाला आहे. अनेक विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बाहेरील परीक्षा केंद्र मिळाले, तर काहींच्या हॉलतिकिटवर केंद्राचे नाव नव्हते. या सगळ्या गोंधळात शासनालाही परीक्षा अखेर रात्री रद्द करावी लागली.

हे देखील पहा :

मात्र ऐनवेळी परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक ताण सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांनी आदल्या दिवशीच परीक्षा केंद्र असणाऱ्या शहरात जाऊन मुक्काम केला होता. तर, अनेक गरीब विद्यार्थ्यांनी परीक्षा स्थळी जाण्याकरता पैश्यांची जुळवाजुळव करून एसटी महामंडळाचे बस पास देखील काढले होते.

परीक्षा रद्द केल्यामुळे काढलेले पास परत घेऊन आम्हा गरीब, बेरोजगार मुलांना शासनाने निदान पासचे तरी पैसे परत करावे यासाठी विद्यार्थ्यांनी आगार व्यवस्थापकास निवेदन दिले. मात्र, वाशिम आगारात परीक्षार्थींना पासेस चे पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळं आधीच बेरोजगार असलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक फटका बसला आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन पासेसचे पैसे परत करावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Benifits Of Termeric: हळदीमुळे शरीराला होणारे आश्चर्यचकित फायदे, जाणून घ्या

Yavatmal News: धक्कादायक प्रकार! यवतमाळमधील शासकीय रुग्णालयात रुग्णाच्या आईला डॉक्टरांकडून मारहाण

SRH vs GT: हैदराबाद - गुजरात सामन्यात कोण पाडणार धावांचा पाऊस? या ४ खेळाडूंवर असतील साऱ्यांच्या नजरा

Emergency Released Date : कंगनाच्या 'इमर्जन्सी'ची रिलीज डेट पुन्हा पुढे ढकलली, आता चित्रपट कधी प्रदर्शित होणार ?

Akola News: व्यावसायिक अरुणकुमार वोरा अपहरण प्रकरण, पोलिसांनी ५ जणांना ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT