मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आज आझाद मैदानाकडे कूच
अंतरवाली सराटी येथून सकाळी १० वाजता हजारो आंदोलकांसह मुंबईकडे निघाले
आंदोलकांना संबोधित करताना बलिदान द्यायला तयार असल्याचं पाटलांनी स्पष्ट केलं
आत्महत्येऐवजी शांततापूर्ण आंदोलनाद्वारे आरक्षण मिळवू, असं आवाहन
मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठी समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange patil) मुंबईच्या आझाद मैदानमध्ये उपोषणाला बसणार आहेत. आज अंतरवाली सराटी येथून ते मुंबईच्या दिशेनं कूच करतील. आज सकाळी १० वाजता मनोज जरांगे पाटील हे मराठा आंदोलकांसह अंतरवाली सराटी येथून निघतील. नंतर निश्चित केलेल्या मार्गातून २९ तारखेला आझाद मैदानमध्ये पोहोचतील.
निघण्यापूर्वी त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. संबोधित करताना त्यांनी आंदोलकांना आवाहन केलं. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर थेट आरोप करत इशारा दिला.
लातूरमध्ये काल एका तरूणानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, 'काल एका तरूणानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ते करू नका. मराठ्यांना तुम्ही आडवले. गॅझेट असूनही देत नाही. मराठी आणि कुणबी एक आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मराठ्यांचा सयंम ढासळू देऊ नका', असं जरांगे पाटील म्हणाले.
'मराठा आरक्षणासाठी मी बलिदान द्यायला तयार आहे. मुंबईमध्ये आल्यावर मला गोळ्या झाड्या. आमच्या शेकडो आत्महत्या तुमच्यामुळे झाल्या आहेत. याला तुम्ही जबाबदार आहात', असा थेट आरोप जरांगे पाटील यांनी फडणवीस यांनी केला आहे. 'आजपासून कुणीही आत्महत्येचा प्रयत्न करायचा नाही. आपण डाव टाकून आरक्षण मिळवायचा आहे', असंही पाटील म्हणाले.
'कृपया आत्महत्या करू नका. शांततेचे आंदोलन कुणीही रोखू शकत नाहीच. शातंता कुणीच सोडायची नाही', असंही आंदोलनकर्त्यांना आवाहन करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले. 'सात-आठ टप्पे ठरले आहेत. एकानेही दगडफेक जाळपोळ करायची नाही. निर्णायक टप्प्यांवर आंदोलन होईल', असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.