rbi fines 1 cr to yavatmal dcc bank  saam tv
महाराष्ट्र

Yavatmal DCC Bank : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेला एक कोटीचा दंड, आरबीआयची कारवाई

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद देशपांडे यांनी मायक्रो प्लॅनिंग सुरू केले होते.

Siddharth Latkar

- संजय राठोड

Yavatmal News :

रिझर्व बँकेच्या पतधोरणानुसार पर्याप्त भांडवल मर्यादा न पाळल्याने यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेवर (yavatmal dcc bank) दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. आता पर्यंत बँकेला एक कोटी रुपयांचा दंड ठाेठावण्यात आला आहे. (Maharashtra News)

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सध्या अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. यातून बँकेला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद देशपांडे यांनी मायक्रो प्लॅनिंग सुरू केले होते. त्यांनी सुरू केलेल्या प्रयत्न यशस्वी होतील अशी खात्री कर्मचाऱ्यांना होती.

कठीण प्रसंगातून मार्ग निघत असताना यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद देशपांडे यांनी दोन महिन्यांतच राजीनामा दिला. बँकेतील अंतर्गत राजकारणाला कंटाळून दोन महिन्यात दोन सीईओंनी राजीनामे दिल्याने सहकार क्षेत्रात खळबळ माजली. दरम्यान देशपांडे यांच्या राजीनाम्याची बाब कर्मचाऱ्यांना पचनी पडलेली नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना बसला मोठा धक्का! एकाच झटक्यात भाव गगनाला भिडले, काय आहेत नवे दर?

Maharashtra News Live Update: ....अन्यथा मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्यांचा व शासकीय वाहनांचा लिलाव करणार- रविकांत तुपकर

Cardamom Benefits : सलग १५ दिवस वेलची खाल्ल्याने शरीरात होतील 'हे' ६ महत्त्वाचे बदल

Career Horoscope : आजपासून ‘या’ ५ राशींचं नशीब पालटणार! कामाचा ताण होईल कमी अन् पैशांचा पाऊस पडणार

Earphone side effects: इअरबड्स काढल्यानंतरही कानात शिट्टीसारखा आवाज ऐकू येतोय? शरीराचा हा इशारा अजिबात दुर्लक्षित करू नका

SCROLL FOR NEXT