accident file news  saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar Accident News: नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; रयत शिक्षण संस्थेच्या प्राचार्यांचा मृत्यू

नगर-मनमाड महामार्गावर अपघात झाल्याचं वृत्त हाती आलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन बनसोडे

Ahmednagar News : नगर-मनमाड महामार्गावर अपघात झाल्याचं वृत्त हाती आलं आहे. नगर मनमाड महामार्गावर शिर्डी नजीक झालेल्या अवजड कंटेनर आणि कारचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात रयत शिक्षण संस्थेच्या पाचार्यांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नगर-मनमाड महामार्गावर(Ahmednagar-Manmad Highway) शिर्डीजवळ झालेल्या अपघात (Accident) झाल्याची घटना घडली. अवजड कंटेनर आणि कारच्या अपघातात रयत शिक्षण संस्थेचे जेष्ठ प्राचार्य राजेंद्र बर्डे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

या भीषण अपघातात बर्डे यांच्या कारचा अक्षरशः चक्काचुर झाला आहे. शिस्तप्रिय म्हणून ओळख असलेल्या प्राचार्य राजेंद्र बर्डे यांच्या निधनाने अहमदनगर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

समृद्धी महामार्गावर खासगी बसला भीषण अपघात

नागपूरहून (Nagpur) औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा नजीकच्या असोला फाटा गावाजवळ हा अपघात झाला. अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे, तर 20 प्रवासी जमखी झाल्याची माहिती मिळत आहे.

राही ट्रॅव्हल्सची खाजगी लक्झरी बस नागपूरहून औरंगाबादला जात असताना देऊळगावजवळ बसला अपघात झाला. बस समृद्धी महामार्गावर मध्यभागी उलटली. अपघाताग्रस्त बसमधून प्रवासी बाहेर निघून महामार्गाच्या बाजूला जात होते. (Latest Marathi News)

प्रवासी रस्ता ओलांडत असताना मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने दोन प्रवाशांना चिरडले. यात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर एक प्रवासी गंभीर जखमी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उत्तर प्रदेश सरकारच्या कृत्याविरोधात मालेगावात पडसाद

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

Laxman Hake : लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार? सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टीचं सेवन करताना दिसतंय? तर ठरतं शुभ संकेत

Politics : आगामी निवडणुकीपूर्वी बाहुबली नेत्याला जोरदार झटका, मुलाने स्थापन केला वेगळा पक्ष

SCROLL FOR NEXT