rayat kranti sanghatana andolan for milk price in presence of sadabhau khot saam tv
महाराष्ट्र

Sadabhau Khot: सदाभाऊंची राजू शेट्टींवर बाेचरी टीका, महाराष्ट्रात दूध आंदोलनाचा भडका उडेल; सरकारला दिला इशारा

रयत क्रांती संघटनेच्या वतीने आज राज्यभर शासनाने काढलेल्या दूध दर परिपत्रकाची होळी करण्यात येत आहे.

विजय पाटील

Sangli News :

स्वतःच्या अंगावर गुलाल उधळून घेतला त्यां शेतकरी नेत्याने यावर्षीच्या भावा पासून शेतकऱ्यांच लक्ष विचलित केल्याचे पाप केले अशी बाेचरी टीका रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खाेत यांनी राजू शेट्टींचे (raju shetti) नाव न घेता केली. दरम्यान शासनाने दूध दरात वाढ करा अन्यथा आंदोलनाचा भडका उडेल अशा इशारा माजी मंत्री सदाभाऊ खोत (sadabhau khot latest marathi news) यांनी सरकारला दिला आहे.

सांगलीच्या रेठेरेधरण येथे खाेत आणि त्यांच्या सहकार्यांनी शासनाच्या दूध दराची हाेळी (milk price) केली. त्यावेळी सदाभाऊ खाेत म्हणाले यंदा उसाचे क्षेत्र घटणार आहेत. साखरेचा तुटवडा भासणार आहे. काल शेतकरी नेत्याचं आंदोलन झाले आणि स्वतःच्या अंगावर गुलाल उधळून घेतला. शेतकऱ्यांना अधिक 100 रुपये मिळवून दिले पण ज्यावेळी कारखानदार प्रस्ताव शासनाला पाठवतील आणि मग तो दर मिळणार आहे असे त्यांनी नमूद केले.

सदाभाऊ पुढं बाेलताना म्हणाले यावर्षीच्या भावा पासून शेतकऱ्यांच लक्ष विचलित केल्याचे पाप या शेतकरी नेत्याने केले. कारखानदार बरोबर कट रचला गेला पण आम्ही हा कट उधळून लावू अशी टीका सदाभाऊंनी राजू शेट्टी यांचे नाव न घेता केली.

राज्य शासनाने २४ जुलै २०२३ रोजी काढलेल्या दूध दर परिपत्रकाप्रमाणे सहकारी व खासगी दूध संघ दूध उत्पादकांना दर देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत. आज राज्यभर काढलेल्या दूध दर परिपत्रकाची होळी करण्यात येत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वाळवा तालुक्यातील रेठरेधरण येथे शेतकरी बांधवांना सोबत घेऊन खोत यांनी होळी करत शासनाने लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर राज्यामध्ये दूध आंदोलनाचा भडका उडेल असा इशारा देखील माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सरकारला दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

हे वागणं बरं नव्हं! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मेट्रोत महिलेचा विचित्र डान्स; व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात

Avoid With Tea: चहा प्यायचाय? मग 'या' गोष्टींसोबत कधीही पिऊ नका, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

Friday Horoscope Update : काही गुपितं इतरांना सांगणे टाळा, वाचा आजचे राशीभविष्य

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

SCROLL FOR NEXT