Ravikant Tupkar News Saam Tv
महाराष्ट्र

Ravikant Tupkar News: रविकांत तुपकरांच्या पत्नीची शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार; नेमक प्रकरण काय?

बुलढाणा जिल्ह्यात शिंदे गट विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटना असा सामना रंगताना पाहायला मिळत आहे.

संजय जाधव

Buldhana News: राज्याच्या राजकारणात सध्या वातावरण तापलं आहे. त्याच दरम्यान एक मोठी बातमी येत आहे. बुलढाणा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या पत्नी शर्वरी तुपकर यांनी शिंदे गटाच्या पाच जनाविरोधात चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून शिंदे गटाच्या पाचही आरोपी विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील चिखली येथील गाडे बंधूंनी तब्बल 300 शेतकऱ्यांची (Farmer) फसवणूक करत पोबारा केला होता. याच प्रकरणावरून गाडे बंधूंची बाजू न्यायालयात मांडणाऱ्या शर्वरी तुपकर यांना शिंदे गटांकडून टारगेट केलं गेलं होतं. त्यांच्या विरोधात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी चिखली येथे पत्रकार परिषद घेतली होती.

त्याचबरोबर सोशल मीडियावर (Social Media) त्यांच्या बाबत अपशब्द वापरले असल्याचा आरोप शर्वरी तुपकर यांनी केला आहे. या प्रकरणी रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्या पत्नी शर्वरी तुपकर यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर शिंदे गटाचे गजानन मोरे, शिवाजी देशमुख, गोपीनाथ महाले, नारायण गरड आणि विलास घोलप यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात शिंदे गट विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटना असा सामना रंगताना पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या महिला सदस्यावर जीवघेणा हल्ला

Vidhyanand Bapat: विद्यानंद बापट आले अडचणीत! गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी; कोणी आणि का केली मागणी?

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

SCROLL FOR NEXT