Ravikant Tupkar, Buldhana
Ravikant Tupkar, Buldhana Saam Tv
महाराष्ट्र

Ravikant Tupkar News: रविकांत तुपकर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुन्हा आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट

संजय जाधव, साम टीव्ही

Buldhana News: शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. खासगी बाजारात हरभरा उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव आहे. त्यामुळे शेतकरी नाफेडच्या खरेदीकेंद्राकडे वळत आहे.

गेल्यावर्षी जिल्ह्यात ७५ खरेदी केंद्र होती तर यावर्षी केवळ २४ खरेदी केंद्र चालू आहे. सदर खरेदी केंद्रांची संख्या वाढवावी, फार्मर प्रोड्युसर कंपन्यांनाही खरेदीस परवानगी द्यावी, तसेच नोंदणीसही मुदतवाढ द्यावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह व फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या प्रतिनिधींसह जिल्हाधिकारी डॉ. ह.पी. तुम्मोड यांची भेट घेतली. हरभरा खरेदी केंद्रांमध्ये वाढ करावी, या मागणीसह पीकविमा, अतिवृष्टीची नुकसान भरपाई व बँकांच्या सक्तीच्या वसुलीबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. जिल्ह्यात हरबऱ्याचा पेरा मोठा आहे परंतु हरबरा खरेदीसाठी नाफेडचे केवळ २४ केंद्रच सुरु आहेत. (Latest News)

गेल्यावर्षी जिल्ह्यात ७५ खरेंदी केंद्र होते, त्यामुळे खरेदी केंद्राची संख्या वाढवणे आवश्यक आहे. आपल्या मालाची नोंदणी करण्यासाठी एका शेतकऱ्यांला कमीत कमी २० मिनिटे वेळ लागत असल्याने फार कमी शेतकऱ्यांची नोंदणी होत आहे.

त्यामुळे तातडीने खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्यात यावी, तसेच उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनानुसार शेतकऱ्यांनी फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडे ऑफलाईन पद्धतीने नोंदणीसाठी कागदपत्रे जमा केली आहे. त्यांनाही खरेदीसाठी तातडीने परवानगी देण्यात यावी व नोंदणीसाठी १५ मार्चपर्यंत असलेल्या मुदतीत वाढ मिळावी, अशी मागणी तुपकरांनी केली आहे.

पिकविम्याचा वाढीव मोबदला जमा करावा

पिकविमा कंपनीकडे बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक नैसर्गिक आपत्ती व पोस्ट हार्वेस्टिंग अंतर्गत मंजूर असलेल्या २५ ते ३० हजार शेतकऱ्यांचा व नामंजूर असलेल्या २६ हजार ७१९ शेतकऱ्यांचा पिकविमा अद्यापही बाकी आहे. त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने पिकविम्याची रक्कम जमा करण्यात यावी, तसेच ज्या शेतकऱ्यांना पिकविम्याची अत्यल्प रक्कम मिळाली त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सन्मानजनक वाढीव मोबदला जमा करावा, अशीही मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तुपकरांच्या जलसमाधी आंदोलनानंतर १७४ कोटी रुपये मंजूर आहेत. परंतु अजुन त्यांचे वाटप झाले नाही. सदर रकमेचे वाटप तात्काळ करावे, अशी मागणी पुन्हा एकदा तुपकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली. यावर्षी शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे.

सोयाबीन-कापसाला भाव नाही, अशा परिस्थितीतही बँकांकडून कृषि व कृषिपुरक कर्जाची सक्तीने वसुली चालू आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत सदर सक्तीची वसुली तातडीने थांबविण्यात यावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा केली व शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

पुन्हा आंदोलनाचा इशारा

रविकांत तुपकर व त्यांच्या सहकाऱ्यांना आत्मदहन आंदोलनानंतर दर आठवड्यात पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावावी लागते. तसेच आंदोलनाबाबत न्यायालयाने निर्बंध घातले होते, ते पुढील १५ दिवसात शिथिल होणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या दमाने आंदोलनाची तयारी तुपकरांनी सुरु केली आहे. आत्मदहन आंदोलनाच्या दणक्याने जिल्ह्यात पिकविम्याचे ५२ कोटी रुपये जमा झाले होते व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्यात आले होते.

पण अजूनही पिकविमा मंजूर असलेल्या २५ ते ३० हजार व पिकविमा नामंजूर असलेल्या २६ हजार शेतकऱ्यांना पिकविमा मिळावा, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचे वाटप व्हावे व बँकांनी सक्तीची वसुली थांबवावी, या मागण्यांसाठी रविकांत तुपकरांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. जर येत्या १५ दिवसांत मागण्यांची पूर्तता झाली नाही तर पुन्हा एकदा आक्रमक आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येईल, असा इशारा तुपकरांनी दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Manus : महाराष्ट्रात मराठी माणसाला अशी वागणूक, म्हणे 'नॉट वेलकम'! मराठी तरूणाच्या मनाला काय वाटलं? वाचा

Today's Marathi News Live : PM मोदी देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या स्थानी आणणार- फडणवीस

Yashwant Killedar MNS | मनसे आणि ठाकरे गट शिवाजी पार्क कुणाला?

Kesar Benefits : केसरचे आरोग्यासाठी भन्नाट फायदे

Dindori Lok Sabha Election | दिंडोरीत शरद पवार गटाची मोठी खेळी; J P Gavit यांची लोकसभेतून माघार

SCROLL FOR NEXT