ravikant tupkar declares aandolan at mantralaya for cotton and soyabean price  saam tv
महाराष्ट्र

Ravikant Tupkar: शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसतील तर मंत्रालयात मंत्री अंडी उबवायला बसलेत का? रविकांत तुपकर

२९ नोव्हेंबरला मंत्रालयाचा ताबा घेणार म्हणजे घेणार असा ठाम निर्धार रविकांत तुपकरांनी आजही व्यक्त केला.

संजय जाधव

Buldhana News :

कापसाला व सोयाबीनला योग्य हमी भाव एक आठावड्यात सरकारने द्यावा अन्यथा 29 नोव्हेंबरला लाखो शेतक-यांसमवेत मंत्रालयाचा ताबा घेऊ असा इशारा रविकांत तुपकर (ravikant tupkar latest marathi news) at mantralaya यांनी सरकारला दिला हाेता. तुपकरांच्या इशा-यानंतर बुलढाणा पोलीसांनी 149 अंतर्गत नोटीस बजावली आहे. (Maharashtra News)

या आंदोलना पासून परावृत्त करण्यासाठी बुलढाणा पोलीसांनी बजावलेलल्या नोटीस बाबत बाेलताना रविकांत तुपकर म्हणाले अशा नाेटीसेला मी भीक घालत नाही. अशा प्रकारच्या नाेटीसांनी आमची कपाटं भरली आहेत. आंदाेलन करण्याचा आमचा अधिकार आहे. आमची मागणी रेटने हा आमचा अधिकार आहे.

सरकारने कापूस आणि सोयाबीनच्या प्रश्नावर लक्ष द्यावे यासाठी आम्ही मागणी करीत आहाेत, आंदाेलन छेडत आहाेत. हा आमचा गुन्हा असेल तर अशा कितीही नाेटीसा आल्या तर आम्ही घाबरणार नाही.

येत्या 29 तारखेला मुंबईत जाऊन मंत्रालय ताब्यात घेणार म्हणजे घेणार. हे मंत्रालय सामान्य लाेकांच्या पैशातून उभारले गेले आहे. तेथे मंत्री सामान्य शेतक-यांचे प्रश्न साेडविणार नसतील तर ते मंत्रालयात काय अंडी उबवायला बसलेत का? असा सवाल रविकांत तुपकर यांनी उपस्थित करुन ते आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचे स्पष्ट केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Cancer Symptoms: भूक कमी अन् सतत थकवा जाणवतोय? तुम्हाला लिव्हर कॅन्सर तर नाही ना? वाचा लक्षणे

Maharashtra Live News Update: वडापावमध्ये आढळले प्लास्टिकचे तुकडे

Home Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराच्या दरवाज्यांना कोणता रंग द्यावा?

GK: ४,००० किमीचा प्रवास! देशातील सर्वात लांब महामार्ग कोणता?

EPFO New Scheme : EPFO ची नवी योजना, १ लाखांपर्यंत पगारदारांना १५ हजारांचा फायदा! ३० एप्रिलपर्यंत नोंदणीची संधी |VIDEO

SCROLL FOR NEXT