Ratnagiri : वीस वर्षे उलटली तरीही जामदा धरणग्रस्तांचे पुनर्वसन नाहीच!
Ratnagiri : वीस वर्षे उलटली तरीही जामदा धरणग्रस्तांचे पुनर्वसन नाहीच! SaamTvNews
महाराष्ट्र

Ratnagiri : वीस वर्षे उलटली तरीही जामदा धरणग्रस्तांचे पुनर्वसन नाहीच!

अमोल कलये.साम टीव्ही रत्नागिरी

रत्नागिरी : सिंचन घोटाळ्याप्रकरणी महाराष्ट्रातील ज्या धरणांची एसीबीकडून चौकशी सुरु होती, त्यामध्ये राजापूर तालुक्यातील काजिर्डा जामदा मध्यम प्रकल्प देखील होता. 300 कोटी पेक्षा जास्त रक्कम खर्च करून देखील 40 टक्के देखील काम पूर्ण झालेलं नव्हतं. 2015 साली या धरणाच्या कामाची चौकशी सुरू झाली. त्यानंतर आता पुुन्हा एकदा धरणाचे रखडलेलं काम सुरू झाले आहे. मात्र, धरणाच्या पुनर्वसनाच्या कामामध्ये जरासुध्दा प्रगती झालेली नाही.

हे देखील पहा :

तरीदेखील आता नव्याने काम सुरू झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत धरणाचे काम पूर्णत: थांबवावे, तसेच नवीन काम सुरू करण्याबाबत शासनाचा जो निर्णय आहे तो आम्हाला निदर्शनास आणून द्या या मुख्य मागणीसाठी ग्रामस्थ रविवारपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. सध्या एकूण 5 जण शेकडो ग्रामस्थांसह आमरण उपोषणाला बसले. प्रदीप शांताराम चंदूरकर, चंद्रकांत राजाराम शिंदे, मनोहर धोंडू राणे,  संभाजी पांडुरंग गुरव, गणेश धोंडू गुरव हे आमरण उपोषणाला बसले आहेत.

पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे, तसेच यापुढे तीव्र आंदोलन करुन प्रकल्पाला विरोध करण्याचा इशारा दिला आहे. तसेच ठेकेदाराचा मनमानी कारभार सुरू असून, आमच्या मालकी जागेत जाण्यासह मज्जाव केला जात असल्याचा आरोप करत ठेकेदाराविरोधात तीव्र संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे. 

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ghatkopar Hording Collapse: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा १४ वर; ४३ जणांवर उपचार सुरू, रात्रभर बचावकार्य

Rashi Bhavishya: 'या' राशीच्या लोकांना जोडीदाराचे प्रेम मिळणार, तुमच्या राशीत काय?

Today Horoscope: कटकटी वाढतील, सावधगिरीने काम करा; 'या' चार राशीच्या लोकांचा आज धनयोग फळफळणार

Yamaha च्या या स्कूटरमध्ये मिळेल 21 लीटर अंडरसीट स्टोरेज, 49 Kmpl मायलेज; जाणून घ्या किंमत

Upcoming Bikes: मार्केट होणार जाम! जूनमध्ये लॉन्च होणार Royal Enfield Guerrilla 450; किती असेल किंमत?

SCROLL FOR NEXT