Ratnagiri Rain Updates, crocodile saam tv
महाराष्ट्र

Ratnagiri Rain Updates : तोणदे गावात पाणी शिरलं, मगरींच्या भीतीने युवकाने काढली रात्र झाडावर (पाहा व्हिडीओ)

Ratnagiri Youth Video Viral : नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने केले आहे.

अमोल कलये

Ratnagiri News : रत्नागिरी जवळच्या काजळी नदीला पूर आला आहे. घाट माथ्यावरती होत असलेल्या पावसामुळे तोणदे गावात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तोणदे गावातल्या साम मंदिरापर्यंत पाणी आले आहे. दरम्यान जिल्ह्यात 25 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह हे स्वत: पूरस्थितीवर लक्ष ठोवून आहेत. (Maharashtra News)

रत्नागिरीतील तोणदे गावाला पुराचा फटका बसलाय. इथली भातशेती पुर्णपणे पाण्याखाली गेलीय. गेल्या चार दिवसांपासून इथली भातशेती पाण्याखाली आहे. पाण्याचा फुगवटा आल्यान मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. घाटमाथ्यावर पाऊस पडत असल्यानं काजळी नदीच्या (kajli river) पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालीय आणि नदीचं पाणी तोणदे गावात शिरलं आहे.

रात्रभर तरुण झाडावर

मंडणगड तालुक्यातील मांदिवली चिंचघर भारजा नदीला महापूर आल्याने एक व्यक्ती रात्री वाहुन गेला होता. तो रात्रभर झाडावर चढून बसला होता. यावेळी पाण्यात (water) माेठ्या संख्येने मगरी असल्याने त्या व्यक्तीने झाडाचा आसरा घेत आपले प्राण वाचवले. गावातील लोकांनी त्याला दोरीच्या सहाय्याने बाहेर काढले. आता हा व्हिडीओ सर्वत्र चांगलाच व्हायरल होतोय.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Schoking News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

SCROLL FOR NEXT