Ratnagiri News Saam tv
महाराष्ट्र

Ratnagiri News : शिवसेना हि एकच, उद्धव ठाकरे शिवसेनेचे नाही; योगेश कदम यांनी साधला निशाणा

Ratnagiri news : विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहिली जात आहे. यावर बोलताना दापोली मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार योगेश कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे

Rajesh Sonwane

अमोल कलये 

रत्नागिरी : शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत मनात नाही. शिवसेना ही एकच आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी चालते ती शिवसेना आहे. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे राहीलेले नाही. त्यामुळे शिवसेना विरुद्ध उबाठा अशीच लढत होईल; अशी प्रतिक्रिया योगेश कदम यांनी दिली आहे. 

विधानसभा निवडणुकीत (Ratnagiri) रत्नागिरी मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहिली जात आहे. यावर बोलताना दापोली मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार योगेश कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले, कि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे शिवसेना, बाळासाहेबांच्या विचारांचे राहिलेले नाही. केवळ ठाकरे आडनाव असल्याने त्यांना मान असल्याचे देखील कदम यांनी सांगितले. 

लोकसभेला ज्यांनी काँग्रेसला मतदान केलं त्यांनी आम्हाला शिवसेना, निष्ठा शिकवू नये. विनायक राऊतांनी गद्दाराची भाषा करु नये. त्यांनी त्यांच्या नेत्याकडे पहावं. उद्धव ठाकरेंनी कुठलं नेतृत्व, आंदोलन केलेलं नाही. त्यांनी गुंडांची भाषा वापरू नये. आमच्यावर टीका करण्यापेक्षा उद्धव ठाकरे अडीच वर्षाचा मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रासाठी काय केलं यावर त्यांनी बोलावं; असा टोला देखील कदम यांनी ठाकरे यांना लगावला आहे. उद्धव ठाकरे बॅग तपासणी केली. निवडणूक आयोग त्यांचे काम करते. शिंदेंची देखील बॅग तपासणी केली होती. मोठा नेता आहे म्हणून त्याची बॅग तपासली जाऊ नये; असा नियम नाही, असेही स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack risk: तुम्हीही रोज करताय का या चुका? हळूहळू हृदयाला पोहोचतंय नुकसान, हार्ट अटॅकचा धोका वाढवणाऱ्या सवयी जाणून घ्या

Yavatmal Bus Accident: दारव्हा-आर्णी मार्गावर भीषण अपघात! एसटी बसची दुचाकीला धडक; दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू

Walking Backward Benefits: गुडघेदुखीपासून मिळेल आराम? उलटे चालण्याचे फायदे जाणून थक्क व्हाल

आकाशाशी स्पर्धा करत वंदे भारतचा अविस्मरणीय प्रवास, श्रीनगर-जम्मू प्रवास फक्त ३ तासांवर, नंदनवनाच्या पर्यटनाला मिळणार चालना

Maharashtra News Live Update : महाविकास आघाड़ी भूमिकेमुळे शेकाप नाराज

SCROLL FOR NEXT