Ratnagiri News What exactly caused the death of the whale fish forest department shocking information Saam TV
महाराष्ट्र

Whale Fish Death: समुद्र किनारी आलेल्या बेबी व्हेलचा मृत्यू कशामुळे झाला? शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासा

Ganpatipule Whale Fish Death: गणपती पुळे समुद्रकिनारी आलेल्या त्या बेबी व्हेलचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याचा प्राथामिक अहवाल समोर आला आहे.

Satish Daud

Ganpatipule Whale Fish Death

गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर वाहून आलेल्या बेबी व्हेलचा अखेर मृत्यू झाला. या माशाला वाचवण्यासाठी प्रशासनासह गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. परंतू गुरुवारी पहाटे त्याने प्राण सोडले. दरम्यान, या बेबी व्हेलचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याचा प्राथामिक अहवाल समोर आला आहे.

सोमवारी (१२ नोव्हेंबर) गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्याजवळ ग्रामस्थांना व्हेल माशाचं पिल्लू बेशुद्ध अवस्थेत आढळून आलं होतं. या पिल्लाचं वय जवळपास ५ ते ६ महिने इतकं होतं. त्याची लांबी ३० फूट आणि वजन सुमारे ४ टन होतं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हेल माशाचं हे पिल्लू समुद्रकिनारी आलंच कसं? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाकडून या व्हेल माशाला जिवंत ठेवण्यासाठी कसरत सुरू होती. शेकडो हातांनी तब्बल ४२ तास प्रयत्न करून त्याला जीवंत ठेवले.

बेबी व्हेलला जिवंत ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी अतोनात प्रयत्न केले. कापडामध्ये गुंडाळून त्याच्यावर दिवसभर पाण्याचा मारा केला जात होता. भरती सुरू झाल्यानंतर मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत या माशाला जेसीबीच्या सहाय्याने समुद्रात सोडण्यात आले होते.

परंतू बुधवारी परत ते समुद्रकिनारी आले. यावेळी देखील प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न करत त्याला समुद्रात सोडले. पण गुरुवारी सकाळी पुन्हा हा बेबी व्हेल समुद्रकिनारी आढळून आला. यावेळी त्याने जीव सोडलेला होता.

गुरुवारी दुपारी गोव्यातील एजन्सीकडून माशाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याचा व्हिसेरा राखून ठेवला आहे.व्हेलच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसले तरी उपासमारीने मृत्यू झाला असा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

SCROLL FOR NEXT