Ratnagiri Water Crisis Saam tv
महाराष्ट्र

Ratnagiri Water Crisis : रत्नागिरीत पाणीटंचाईची दाहकता; अनेक गावात टँकरने पाणीपुरवठा

Ratnagiri News : राज्यातील पाणी टंचाईची समस्या अधिक तीव्र होण्यास सुरवात झाली आहे. राज्यातील बहुतांश भागात पाण्याची समस्या गडद होताना दिसून येत आहे. यामुळे नागरिकांना पायपीट करत पाण्याची तहान भागवावी लागत आहे

अमोल कलये

रत्नागिरी : उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने अनेक भागात पाणीटंचाईची समस्या जनविण्यास सुरवात झाली आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात देखील पाणी टंचाईची दाहकता आता वाढण्यास सुरवात झाली असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. पाणी टंचाईची समस्या कमी करण्यासाठी काही गावांमध्ये आतापासूनच ट्रॅकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येऊ लागला आहे. 

राज्यातील पाणी टंचाईची समस्या अधिक तीव्र होण्यास सुरवात झाली आहे. राज्यातील बहुतांश भागात पाण्याची समस्या गडद होताना दिसून येत आहे. यामुळे नागरिकांना पायपीट करत पाण्याची तहान भागवावी लागत आहे. तर काही ठिकाणी पाण्याची भीषणता दूर करण्यासाठी ट्रॅकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आगामी काळात हि दाहकता आणि टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे. 

२५ वाड्यांना ट्रॅकरद्वारे पाणी 

पाणी पातळीत सध्या मोठ्या प्रमाणात घट झालेली पहायला मिळत आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम पाणी पातळीवर झाला असून जलस्रोत आटू लागले आहेत. काही ठिकाणी विहीरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. रत्नागिरी तालुक्यातल्या ५ गावांमधील २५ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सध्या सुरु आहे. प्रशासनाकडून ५ टँकरने या गावांना पाणीपुरवठा सुरु आहे.

मे महिन्यात अधिक भीषणता 

रत्नागितल्या सोमेश्वर गावात पहिला टँकर सुरु करण्यात आला आहे. यामुळे आतापासूनच गावकऱ्यांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावं लागत आहे. सोमेश्वरमध्ये पाळंदवाडी आणि गुरववाडीला टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. पाऊस पडेपर्यंत अनेक ठिकाणी काटकसरीने पाणी वापरावं लागणार आहे. त्यामुळे मे महिन्यापर्यंत पाणी टंचाईची भीषणता वाढणार असल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : हवामान बदलामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत

मोठी बातमी! ठोकून काढू, कापून टाकू...ठाकरेंच्या दिग्गज शिलेदाराला धमक्यांचे फोन, थेट नंबरच सांगितला

Gold Rate Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं स्वस्त, प्रति तोळा इतक्या रुपयांवर आले, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Mangalsutra Designs: साडीच नाही तर जीन्स-टॉपवरही दिसेल स्टायलिश! पाहा 'इंडो-वेस्टर्न' मंगळसूत्रांचे 5 युनिक पॅटर्न्स

LPG News Rules: गॅस सिलिंडरच्या नियमात मोठे बदल, आता शहरात २५ दिवसांत LPG मिळणार, तर ग्रामीण भागात...

SCROLL FOR NEXT