Uddhav Thackeray Sabha Ratnagiri Saamt
महाराष्ट्र

Uddhav Thackeray: 'उद्योगमंत्र्यांचे उद्योग आम्ही पाहतोय...' उदय सामंतांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी; नेमकं काय म्हणाले?

Gangappa Pujari

गिरीश कांबळे, प्रतिनिधी|ता. ५ फेब्रुवारी २०२४

 Uddhav Thackeray News:

ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरेंच्या सभांचा धडाका सध्या कोकणामध्ये सुरू आहे. उद्धव ठाकरे यांचा जनसंवाद यात्रेचा झंझावात दौरा राजापूरमध्ये पोहोचला असून दौऱ्याचा आजचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. आज राजपुरमधील जवाहर चौकात उद्धव ठाकरे यांची सभा झाल्यानंतर रत्नागिरीमध्येही सभा पार पडली. या सभेत बोलताना ठाकरेंनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

"राजनच्या मतदारसंघातून तुमच्या मतदारसंघात आलो. तुमची पाठ थोपटायला आणि गद्दाराच्या पेकटात लाथ घालायला आलोय. उद्योगमंत्र्यांचे उद्योग आम्ही पाहतोय. आम्हाला शिवसेना शिकवतायेत. हे 2014 साली लाचारी करुन शिवसेनेत आले. मी मंत्री पदाचा शब्द उदय सामंत (Uday Samant) यांना दिला होता तो पाळला आणि उदय सामंत पळाले. बिनडोक माणसाचा करायचे काय?" अशी टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

तसेच "आता राजन साळवी (Rajan Salvi) तुमच्याकडे मी जेवायला जातोय. त्यात काय काय मेजवानी आहे त्याची बातमी आली. आता जेवण झाल्यावर एवढा खर्च केला म्हणून ते अधिकारी परत तुमच्या कडे येतील, पण घाबरू नका राजन मी स्वतः तुमच्यासोबत आहे," अशी कोपरखळीही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लगावली.

भाजपवर निशाणा...

"भाजपला किती नाव लावू? बाहेरची जनता पार्टी, भाड्याची जनता पार्टी, भेकड जनता पार्टी अशी टीका करत गुजरातची चाकरी करणाऱ्या गद्दारांनो तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा नाव घ्यायचा अधिकार नाही. हिंदुत्वाच्या गप्पा मारु नका, मी हिंदुहृदयसम्राटांचा पुत्र आहे याचा अभिमान मला आहे," असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT