Ratnagiri News
Ratnagiri News Saam Tv
महाराष्ट्र

Ratnagiri News: महाराष्ट्र दिनी दुबईमध्ये घुमला महाराष्ट्राचा ढोल; त्रिविक्रम ढोल ताशा पथकाने रचला आगळा- वेगळा विक्रम

Shivani Tichkule

जितेश कोळी

Ratnagiri Latest News: महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी त्रिविक्रम ढोल ताशा पथक दुबई या पथकाचे संस्थापक सागर पाटील यांनी चक्क एक लक्झरी योटवर, पर्शियन गल्फ या समुद्रात, जगातील एकमेव 7 स्टार हॉटेल 'बुर्ज अल अरब' याच्यासमोर, पाण्यात ढोल ताशाचे वादन करत नवीन विक्रम केला आहे. महाराष्ट्र दिनी दुबईमध्ये महाराष्ट्राचा ढोल वाजवणाऱ्या या पथकाचे जगभरातील महाराष्ट्र प्रेमी नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. (Latest Marathi News)

त्रिविक्रम ढोल ताशा पथक दुबई, हे आखाती देशातील पहिले व एकमेव पारंपारिक ढोल ताशा पथक आहे. दरवर्षी साधारण 25 ते 30 वादन करणार हे पथक, आपल्या सादरीकरणातून नेहमीच महाराष्ट्राची कला व संस्कृतीचे उत्तम प्रदर्शन आंतरराष्ट्रीय पातळीवर जगासमोर मांडत आले आहे. (Maharashtra News)

महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी पथकाचे संस्थापक सागर पाटील यांनी चक्क एक लक्झरी योटवर, पर्शियन गल्फ या समुद्रात, जगातील एकमेव 7 स्टार हॉटेल 'बुर्ज अल अरब' याच्यासमोर, पाण्यात ढोल ताशाचे वादन केले.

ही धाडसी कल्पना आखताना सागर पाटील म्हणतात, महाराष्ट्राची कला व संस्कृती परदेशात राहुन जपण्याचे व त्याचा प्रचार करण्याचे काम गेली पाच वर्ष करत आहेत. यावर्षी काहीतरी वेगळे करण्याच्या हेतूने ही संकल्पना आखली. या वादनासाठी पथकातील 20 वादकांनी सहभाग घेतला व यात महिलांचाही समावेश होता.

ही योट दुबई (Dubai) मरीना येथून वादकांना घेऊन निघाली आणि वाटेत Dubai Eye Giant Wheel समोरून वादन करीत बुर्ज अल अरब या हॉटेलच्या समोर पाण्यात थांबली व या ठिकाणी ढोल ताशाचे वादन करून या पथकाने परतीचा प्रवास गाठला. असा हा विक्रम करून दुबईच नव्हे तर जगभरातील सर्व महाराष्ट्रिय जनतेला त्रिविक्रम ढोल तशा पथकाने महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्या दिल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: शरद पवार यांच्या प्रकृतीविषयी मोठी अपडेट

Dindori Lok Sabha: आधी थोपटले दंड आता मिळवले हात; दिंडोरी लोकसभेतून जे पी गावितांची माघार

Govinda And Krushna Abhishek : कृष्णा- गोविंदा वादाचं नेमकं कारण काय?; गोविंदा जरा स्पष्टच बोलला

Raireshwar Fort: १६० मतदारांसाठी अधिकारी, कर्मचा-यांचा ४ हजार ५०५ फुटापर्यंत ट्रेक, रायरेश्वर केंद्र मतदानासाठी सज्ज

Black Pepper Benefits: काळी मिरी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, घ्या जाणून

SCROLL FOR NEXT