Pune Online Fruad
Pune Online FruadSaamtv

Pune Online Fraud: ऑनलाईन टास्क पडला महागात! पुण्यात इंजिनियर महिलेला घातला ३८ लाखांचा गंडा; टेलिग्राम पेजवरुन...

Online Task Review Fraud News: आय टी हब म्हणून ओळख असलेल्या पुण्यात अभियंत्यांनाच फसवणूकीचे शिकार केले जात आहे.

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Pune Cyber Crime: ऑनलाइन व्यवहारांच्या वाढत्या ट्रेंडसोबतच ऑनलाइन फसवणुकीच्या (Online fraud) घटनांमध्येही वाढ होते आहे. पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून अशा ऑनलाईन फसवणूकीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. अशाच प्रकारची आणखी एक घटना समोर आली असून ज्यादा परतावा देण्याचे आमिष दाखवत टास्क पूर्ण करण्यास सांगून पुण्यात अभियंता महिलेची ३८ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Pune Online Fruad
Pune Online Fraud: धक्कादायक! महागड्या गाड्यांची हौस भागवण्यासाठी ४४ पुणेकरांना ऑनलाइन गंडा; कोट्यवधी रुपयांची फसवणूक

याबाबत अधिक माहिती अशी की, ऑनलाईन टास्कच्या नावाने पुणे (Pune News) शहरात फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आय टी हब म्हणून ओळख असलेल्या पुण्यात अभियंतांनांच फसवणूकीचे शिकार केले जात आहे. अशीच एक मोठी फसवणूकीची घटना समोर आली असून इंजिनियर महिलेची तब्बल ३८ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे.

फिर्यादी महिला या आय टी क्षेत्रात कार्यरत असून त्यांना टेलिग्रामवरील फसव्या वेब पेजच्या माध्यमातून ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास आकर्षक पैसे कमावण्याचा विश्वास आरोपींनी दाखवला. यातूनच आरोपींनी फिर्यादीकडून वेळोवेळी अनेक खात्यांवर पैसे ट्रान्स्फर करायला लावले. त्यांना कोणताही परतावा न देता तसेच गुंतवलेली रक्कम परत न करता त्यांची ३८ लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

Pune Online Fruad
Ajit Pawar News : अजित पवारांचं ठरलंय; घेतलेला निर्णय ते कधीच बदलत नाहीत, संजय शिरसाटांचं सूचक वक्तव्य

दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली आहे. या प्रकरणात महिलेने सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली असून टेलीग्राम ॲपवर लिंक पाठविणारे तसेच बँक खातेधारकां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा आता पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com