Uddhav Thackeray Visit To Barsu, Uddhav Thackeray, Barsu saam tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray Visit To Barsu : उद्धव ठाकरेंच्या बारसू दाै-यातील अडचण टळली, महत्त्वाचा विषय अडला (पाहा व्हिडिओ)

दरम्यान उद्या रिफायनरीला समर्थन देणारे देखील उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत असे समजते.

अमोल कलये

Uddhav Thackeray News : बारसू प्रकल्पाला (barsu refinery) विरोध दर्शविणा-या ग्रामस्थांना भेटण्यासाठी ठाकरे गटाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या (शनिवार) बारसू (uddhav thackeray barsu visit) दाै-यावर जाणार आहेत. दरम्यान पाेलिसांनी ठाकरे गटाच्या रानतळे सभेस मनाई आदेश काढला आहे. (Breaking Marathi News)

बारसू रिफायनरीवरुन काेकणासह राज्यातील राजकारण तापले आहे. खासदार विनायक राऊत यांनी ठाकरेंच्या दाै-यात काळी मांजरं आडवी टाकण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे म्हटलं आहे.

उद्या (शनिवार) रिफायनरी प्रकल्पास विरोध करणा-या आंदोलकांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरेंना प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने काेकणातील ठाकरे गटात नाराजीचा सूर पाहयला मिळाला.

दरम्यान उद्धव ठाकरेंच्या हेलिपॅडला प्रशासन आज (शुक्रवार) परवानगी दिली आहे. जैतापूर जवळच्या साखरी इथे हेलीपॅडला परवानगी देण्यात आली आहे. काल रानतळे इथल्या हेलिपॅडला पोलिसांनी नाकारली होती. सुरक्षेचे कारण देत काल परवानगी नाकारली होती. रत्नागिरी निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी आज जैतापूर जवळच्या साखरी येथे हेलिपॅडला परवानगी दिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation: मराठवाड्यात ओबीसी प्रमाणपत्रांची मागणी; ओबीसी नेते आक्रमक

Shocking : पायात सँडल घातली, अन् घात झाला; विषारी सापाच्या दंशाने इंजिनीअरचा मृत्यू

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा नवा जीआर काढणार? मसुद्याला अंतिम रूप देण्याच्या हालचाली

IBPS RRB Vacancy: सरकारी नोकरीची संधी! बँकेत लिपिक ते PO च्या १३,२१७ पदांसाठी बंपर भरती, असा करा अर्ज

TET Exam : टीईटी गैरप्रकाराचा धसका; आता शिक्षकांची चारित्र्य पडताळणी होणार, VIDEO

SCROLL FOR NEXT