Ratnagiri Accident News Saamtv
महाराष्ट्र

Ratnagiri Accident News: दुर्देवी! ट्रक आणि वडाप गाडीचा भीषण अपघात; ४ जणांचा मृत्यू

Dapoli Accident News: अपघातातील 5 जखमींना मुंबईला हलवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे

Gangappa Pujari

अमर घटारे, प्रतिनिधी...

Ratnagiri Accident News: रत्नागिरी दापोलीमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. दापोलीतील आसूद जोशी आळी इथे ट्रक आणि वडाप गाडीमध्ये भयंकर अपघात झाला असून या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रत्नागिरी - दापोलीतील आसूद जोशी आळी येथे दोन वाहनांमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. ट्रक आणि खासगी प्रवासी वाहनामध्ये हा भयंकर अपघात झाला. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाले आहेत.

मृतांमध्ये २ मुलींसह २ जणांचा समावेश आहे. आज (२५, जून) दुपारी 3.30 सुमारास हा भीषण अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही धडक इतकी भयंकर होती की दोन्हीही गाड्यांचा यामध्ये अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातातील 5 जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना मुंबईला हलवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

साताऱ्यात ट्रॅक्टर उलटून चार महिलांचा मृत्यू...

दरम्यान, काल साताऱ्यातही एक दुर्देवी घटना समोर आली होती.  सातारा शहराजवळच्या कारंडवाडी येथे अरुंद पुलावरून जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली उलटून ४ महिलांचा मृत्यू झाला. या अपघातात एका महिला गंभीर जखमी झाली आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. (Satara Tractor Accident)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT