Sangameshwar latest news 
महाराष्ट्र

Ganpati Visarjan : बाप्पाला निरोप देताना भयंकर घडलं! पाण्याचा अंदाज चुकल्याने बाप-लेक बुडाले

Ratnagiri Ganpati Visarjan accident : रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील माभळे येथे गणपती विसर्जनादरम्यान बाप-लेक बावनदीच्या प्रवाहात वाहून गेले. वडिलांना वाचवण्यात यश आले; मात्र मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अमोल कलये

Sangameshwar latest news : संगमेश्वर तालुक्यातील माभळे येथे गणपती विसर्जनादरम्यान काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना घडली आहे. बावनदी पात्रात विसर्जन करत असताना पाण्याच्या खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने बाप-लेक नदीत वाहून गेले. या दुर्घटनेत वडिलांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असले, तरी मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

नेमकी घटना काय घडली?

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी उशिरा माभळे येथील बावनदी पात्रात गणपती विसर्जनाचे काम सुरू होते. यावेळी पुरुषोत्तम घडशी आणि त्यांचा मुलगा प्रज्वल घडशी हे दोघे विसर्जनासाठी नदीत उतरले होते. मात्र, पावसाळ्यामुळे पाण्याचा प्रवाह तीव्र असल्याने आणि पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही अचानक पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ लागले.

ग्रामस्थांचे तातडीने मदतकार्य

बाप-लेक पाण्यात बुडत असल्याचे पाहून तेथे उपस्थित ग्रामस्थांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. श्रीकांत घडशी यांनी न घाबरता नदीत उतरून पुरुषोत्तम घडशी यांना सुखरूप पाण्याबाहेर काढले. त्यानंतर स्थानिक युवकांनी नदीच्या पात्रात शोधमोहीम राबवून मुलगा प्रज्वल घडशी यालाही पाण्याबाहेर काढले. मात्र, दुर्दैवाने प्रज्वलला वेळेवर वैद्यकीय मदत मिळूनही वाचवण्यात यश आले नाही.

माभळे गावावर शोककळा

गणपती बाप्पाला निरोप देत असतानाच घडलेल्या या भयंकर दुर्घटनेमुळे संपूर्ण माभळे गावावर आणि परिसरात शोककळा पसरली आहे. ऐन सणाच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे घडशी कुटुंबावर दुःखाचा मोठा आघात झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT