Youth seriously injured in sickle attack at Afrin Park in Chiplun saam tv
महाराष्ट्र

Koyata Attack: पुण्यापाठोपाठ चिपळूणमध्ये कोयत्याने हल्ला; तरुणाच्या हत्येचा प्रयत्न, शहरात खळबळ

Sickle Attack in Chiplun: रत्नागिरीतील चिपळूण येथे गोवळकोट रोडवरील आफ्रिन पार्कमध्ये दोन गटांत झालेल्या संघर्षानंतर, एका तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आलाय. जखमी तरुणावर 'लाईफ केअर हॉस्पिटल'मध्ये उपचार सुरू आहेत.

Bharat Jadhav

  • चिपळूणमधील आफरीन पार्क येथे तरुणावर कोयत्याने हल्ला

  • गोवळकोट रोड परिसरात दोन गटांत तुफान हाणामारी

  • पुण्यापाठोपाठ रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये कोयता हल्ला

अमोल कलये, साम प्रतिनिधी

पुण्यापाठोपाठ आता रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्येही कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चिपळूणमधील गोवळकोट रोड परिसरातील आफरीन पार्क येथे दोन गटांत तुफान हाणामारी झाली. यावेळी एका तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची माहिती आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गोवळकोट रोडवरील आफरीन पार्क परिसरात दोन गटांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी एका तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याने तो रक्तबंबाळ झाला. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

कौटुंबिक वादातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती

प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादातून हा हल्ला झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जखमी तरुणाला तातडीने लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली. हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याची मागणी करत जमाव आक्रमक झाला. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

भरदिवसा कोयत्याने हल्ला झाल्यामुळे चिपळूणमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात येत असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. या प्रकरणात हल्ल्यामागील नेमके कारण काय, हल्ल्यात कोणाचा सहभाग आहे आणि पुढे कोणती कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : सुवर्णनगरीत सोनं तब्बल ३८०० रुपयांनी स्वस्त! चांदीही ९ हजारांनी घसरली

Maharashtra News Live Update: भामरागड दुष्काळग्रस्त घोषित करण्याचा ठराव मंजूर : शेतकऱ्यांना दिलासा

Kitchen Tips : कुकरच्या शिट्टीतून पाणी बाहेर येतंय? या ६ चुका ठरू शकतात कारणीभूत; जाणून घ्या सोपे उपाय

Dark Chocolate for Period: डार्क चॉकलेट खाल्ल्याने खरंच कमी होतो मासिक पाळीचा त्रास? जाणून घ्या सत्य!

Dates Benefits : रोज खजूर खाण्याचे हे ७ जबरदस्त फायदे! पचनापासून हृदया पर्यंत शरीराला होतात अनेक फायदे

SCROLL FOR NEXT