Ratnagiri Kudoshi Accident Saam TV
महाराष्ट्र

Ratnagiri News : शाळा सुटल्यानंतर घरी निघाली होती शिक्षिका; वाटेतच मृत्यूने गाठलं, हृदयद्रावक घटना!

सुषमा निकम (वय ५५ वर्ष) असे मृत्युमुखी पडलेल्या शिक्षिकेचे नाव आहे.

साम टिव्ही ब्युरो

जितेश कोळी, साम टिव्ही

रत्नागिरी : खेड आंबवली मार्गावरील कुडोशी येथील स्पीड ब्रेकरवर दुचाकी आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुषमा निकम (वय ५५ वर्ष) असे मृत्युमुखी पडलेल्या शिक्षिकेचे नाव आहे. आज (सोमवार) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. (Breaking Marathi News)

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मोहाने जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षिका सुषमा निकम या शाळा सुटल्यानंतर एका दुचाकीच्या मागे बसून आपल्या भरणे बाईतवाडी येथील घरी परतत होत्या. अचानक त्यांची दुचाकी कुडोशी येथील गतिरोधकावर आदळली.

यामध्ये निकम ह्या उंच उडून रस्त्यावर आदळल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.अपघाताची (Accident) खबर मिळताच खेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी मृत झालेल्या निकम यांच्या मृतदेहाचा पंचनामा करून त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. अपघात होऊन एका शिक्षिकेचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KDMC Mayor : कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेचा महापौर कोण होणार? शिंदेंच्या या २ शिलेदारांची चर्चा

Pawar Family: मोठी बातमी! पवार कुटुंब एकत्र येणार? आज किंवा उद्या पवार कुटुंबीय निर्णय घेणार?

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार? मुख्यमंत्र्यांसोबत नेमकं काय बोलणं झालं, प्रफुल्ल पटेलांनी सगळंच सांगितलं

Women Yoga Poses: हाडांच्या मजबुतीसाठी महिलांनी करा 'हे' 5 योगा, पन्नाशीनंतरही राहाल फिट

Maharashtra Live News Update: केडीएमसी महापौर पदासाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT