Ration On ATM  Saam Digital
महाराष्ट्र

Ration On ATM : रेशनच्या रांगेपासून मुक्ती मिळणार, ATM वर मिळणार रेशन

Ration On ATM News : आतापर्यंत पैसे काढण्यासाठी किंवा पैसे जमा करण्यासाठी तुम्ही ATM वापरलं असेल. मात्र आता ATM मधून रेशनचं धान्य मिळणार आहे. पण हे खरंच शक्य आहे का? रेशनचं धान्य देणारं ATM कुठं सुरु झालंय?

साम टिव्ही ब्युरो

भरत मोहोळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

आतापर्यंत पैसे काढण्यासाठी किंवा पैसे जमा करण्यासाठी तुम्ही ATM वापरलं असेल. मात्र आता ATM मधून रेशनचं धान्य मिळणार आहे. पण हे खरंच शक्य आहे का? रेशनचं धान्य देणारं ATM कुठं सुरु झालंय? त्यावरचा हा खास रिपोर्ट....

आतापर्यंत तुम्ही पैसे काढण्यासाठी आणि जमा करण्यासाठी एटीएमचा वापर करत असला. मात्र आता तुम्हाला रेशनचं धान्यही ATMवर मिळणार आहे. ...हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल...मात्र हे खरंय..तुम्हाला आता ATM वर जाऊन धान्य घ्याव लागणार आहे. या रेशनच्या ATM ची वैशिष्ट्ये काय आहेत? पाहूयात...

Grain Dispensing Machine असं या मशीनचं नाव आहे

रेशन कार्ड नंबर आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरणानंतर धान्याचं वितरण

मशीनद्वारे 5 मिनिटांत 50 किलो धान्याचं वितरण

24 तास एटीएमवर धान्य उपलब्ध असणार आहे.

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून सरकार प्रतिव्यक्ती 5 किलो गहू किंवा तांदूळ मोफत देत आहे. जागतिक अन्न वितरण कार्यक्रमांतर्गत ओडिशा सरकारने अन्नपूर्ती मशीनच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावर ATM वर धान्याचं वितरण सुरु केलंय... ही मशीन ओडिशातील सर्व जिल्ह्यात लावण्यात येणार असल्याचं ओडिशाच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी सांगितलंय...या मशीनमुळे रेशनच्या धान्यात होणारा भ्रष्टाचार आणि काटामारी यापासून रेशनधारकांची सुटका होणार आहे. मात्र ही मशीन महाराष्ट्रात कधी आणली जाणार? याकडे साऱ्यांचंच लक्ष लागलंय....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Saree Jewellery: जड साडीसोबत हा डिझायनर कडा नक्की कार ट्राय मिळेल रॉयल लुक

Fort : पावसाळ्यात किल्ल्यावर ट्रेकिंगला जाताय? मग 'या' गोष्टींची घ्या विशेष काळजी

Darya Ghat: मुंबई- पुण्यापासून जवळील दाऱ्या घाट कधी पाहिला का? निसर्गसौंदर्यचा अद्भूत नजारा अनुभवा

Mumbai - Goa Highway : रायगडमध्ये पावसाचं थैमान; मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी | VIDEO

Monsoon Skin Care: पावसाळ्यात चेहऱ्यावर रूक्षपणा आला आहे? 'या' ट्रिक्स वापरून बघा

SCROLL FOR NEXT