Graham Thorpe : क्रिकेट चाहते शोकसागरात! इंग्लंडच्या माजी फलंदाजाचा मृत्यू नव्हे आत्महत्याच, पत्नीने सांगितलं खरं कारण

English cricketer Graham Thorpe : इंग्लंडचा माजी फलंदाज ग्रॅहम थॉर्प याचं 4 ऑगस्ट रोजी निधन झालं होते. मात्र त्याची पत्नी अमांडाने तो बऱ्याच दिवसांपासून आजारी असल्याने नैराश्यात होता, यातून त्याने आत्महत्या केल्यांचं म्हटलं आहे.
Graham Thorpe
Graham ThorpeSaam Digital
Published On

इंग्लंडचा माजी फलंदाज ग्रॅहम थॉर्प याचं 4 ऑगस्ट रोजी निधन झालं होते. इंग्लंड- वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) ५ ऑगस्ट रोजी ही माहिती दिली होती. मात्र आता त्यांच्या मृत्यूबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याचा मृत्यू नैसर्गिक झालेला नाही, तर त्याने स्वत:ला ट्रेन समोर झोकून देऊन आत्महत्या केली आहे, तपासात ही माहिती समोर आली आहे.

Graham Thorpe
Vinesh Phogat: रौप्य पदकाची पुन्हा हुलकावणी; विनेश फोगाटबाबतचा निर्णय तिसऱ्यांदा पुढे ढकलला

ग्रॅहम थॉर्पने इंग्लंडच्या सघाकडून 182 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. दरम्यान 55 वर्षांच्या ग्रॅहम थॉर्पच्या वाढदिवसाच्या ३ दिवसांनंतर 4 ऑगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 12 ऑगस्ट रोजी थॉर्पच्या पत्नी अमांडाने या दिग्गज क्रिकेटपटूने आत्महत्या केल्याचा मोठा खुलासा केला आहे. रेल्वेसमोर उडी मारून त्याने आत्महत्या केली होती. या घटनेनंतर त्याला अनेक गंभीर दुखापती झाल्या, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे.

न्यायालयासमोर सादर करण्यात आलेल्या तपास अहवालात, 4 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता सरे शहरातील एशर रेल्वे स्थानकावर एका व्यक्ती रुळावर पडलेली आढळून आली होती. रेल्वे अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तपासानंतर ग्रॅहम थॉर्प असल्याचं म्हटलं आहे.

Graham Thorpe
Duleep Trophy 2024: पक्के मित्र मैदानात भिडणार! रोहित- बुमराह येणार आमनेसामने

माजी कर्णधार मायकेल आथर्टनला दिलेल्या मुलाखतीत अमांडाने सांगितले की, तिचा पती ग्रॅहम थॉर्प गेल्या दोन वर्षांपासून खराब प्रकृतीमुळे नैराश्य आणि चिंताग्रस्त होता. पत्नी आणि दोन मुली असूनही तो स्वत:ला सावरू शकला नाही. २०२२ मध्येही त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याला अनेक दिवस अतिदक्षता विभागात (ICU) ठेवावं लागलं होतं. तो खूप आजारी होता आणि त्याला वाटत होतं की त्याच्याशिवाय आपल्या कुटुंबाचं जीवन चांगले होईल, पण त्याने आपला जीव गमावला आणि आम्ही उद्ध्वस्त झालो, अशा भावना तिने व्यक्त केल्या. गेल्या शनिवारी फर्नहॅम क्रिकेट क्लब आणि चिपस्टेड क्रिकेट क्लब यांच्यातील सामना सुरू होण्यापूर्वी थॉर्पच्या स्मरणार्थ एक समारंभ आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये त्याची पत्नी आणि मुली उपस्थित होत्या.

ग्रॅहम थॉर्पने 100 कसोटी सामन्यांमध्ये 44.66 च्या सरासरीने 6744 कसोटी धावा केल्या आहेत. त्यात 16 शतके आणि 39 अर्धशतकांचा समावेश आहे. थॉर्पने इंग्लंडकडून 82 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले. या कालावधीत 37.18 च्या सरासरीने 2380 धावा केल्या. थॉर्पने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 21 अर्धशतके झळकवली आहेत. कौंटी क्रिकेटमध्ये संघासाठी 20,000 धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com