rashtra vikas sena protest against zilla parishad, saam tv
महाराष्ट्र

पेय जल योजनेच्या पुर्ततेसाठी राष्ट्र विकास सेना आक्रमक; सावळजला छेडलं आंदाेलन

गावात पाणी चार ते आठ दिवसाकाठी येत असल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

विजय पाटील

सांगली : सांगली (sangli) जिल्ह्यातील तासगाव (tasgoan) तालुक्यातील सावळज येथील गावातील राष्ट्रीय ग्रामीण पेय जल योजनेसाठी अडीच कोटी रुपये मंजूर असून देखील सार्वजनिक नळ पाणी (water) पुरवठा योजनेचे अर्धवट राहिलेले काम तात्काळ पूर्ण करा या मागणीसाठी आज (शुक्रवार) राष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने सावळज गावच्या पाण्याच्या टाकीवर चढून अर्धनग्न (शोले स्टाईल) आंदोलन करण्यात आले. (sangli latest marathi news)

या पाणी पूरवठा याेजनेचे काम लवकरात लवकर पुर्ण करावे या मागणीचे निवेदन सांगली जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुड्डी यांना देऊनही त्यावर कोणतीच कार्यवाही न झाल्याने राष्ट्र विकास सेना पक्षाने आंदाेलन केले.

राष्ट्र विकास सेनेचे पदाधिकारी म्हणाले सावळज गावची मोठी लोकसंख्या असुन गावचे राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम आठ वर्षे रखडलेले आहे. गावात पाणी चार ते आठ दिवसाकाठी येते. ही योजना तात्काळ पूर्ण करा अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देखील आंदाेलकांनी प्रशासनास दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT