rashmi shukla visits gardewada gadchiroli saam tv
महाराष्ट्र

Gadchiroli : नागरिकांच्या सहकार्याने गडचिरोलीतील नक्षलवाद संपवणार : पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला

Rashmi Shukla : जवानांच्या समस्या शासन स्तरावरून सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पाेलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले.

Siddharth Latkar

- मंगेश भांडेकर

Gadchiroli News :

स्थानिक नागरिकांच्या सहकार्यातून गडचिराेली जिल्ह्यातील नक्षलवाद पूर्णपणे संपवला जाईल असा विश्वास राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केला. दरम्यान गडचिरोलीच्या दुर्गम अतिदुर्गम भागात कार्यरत असलेल्या जवानांना बेसिक सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी आपण पुढाकार घेणार असून प्रत्येक महिन्यात गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करू असेही शुक्ला यांनी नमूद केले. (Maharashtra News)

राज्याच्या पोलिस महासंचालक पदाचा पदभार घेतल्यानंतर पहिल्यांदाच पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या शनिवारी गडचिरोलीच्या अतिदुर्गम छत्तीसगड सीमेवरील गर्देवाडा भागात पोहोचल्या.

यावेळी त्यांनी येथे उभारण्यात आलेल्या नवीन पोलीस ठाणे परिसराची पाहणी केली. एक ते दीड महिन्यापूर्वी येथे एका दिवसांमध्ये जिल्हा पोलीस दलाने नव्या पोलीस ठाण्याची निर्मिती केली. या पोलीस ठाण्याच्या परिसराची पोलीस महासंचालक शुक्ला यांनी पाहणी करून नक्षल समस्येचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत राज्य गुप्त वार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन, नक्षलसेल गडचिरोली परिक्षेत्राचे आयजी संदीप पाटील (sandip patil), डीआयजी अंकित गोयल (ankit goyal) उपस्थित होते.

यावेळी पोलीस दलातर्फे आयोजित जनजागरण मेळाव्याला संबोधित करत मेळाव्यात उपस्थित आदिवासी नागरिकांना शेती, घरगुती, शालेय, क्रीडा साहित्याचे वाटप केले. या मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करताना आदिवासी नागरिकांनी पोलीस दलाला सहकार्य करावे असे आवाहन करीत जिल्हा पोलीस आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास शुक्ला यांनी दिला. यावेळी त्यांनी मेळाव्यातील उपस्थित विद्यार्थिनी आणि नागरिकांशी संवाद साधला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलीस महासंचालकांसमोर जवानांनी वाचला समस्यांचा पाढा

दुर्गम भागात कार्यरत पोलीस जवानांसाठी शुक्ला यांनी दरबार भरवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी उपस्थित जिल्हा पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल, केंद्रीय पोलीस दलाच्या जवानांनी दुर्गम भागात कर्तव्य बजावताना येणाऱ्या समस्यांचा पाढा वाचला. जवानांच्या समस्या शासन स्तरावरून सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असून वेगवर्धित पदोन्नती, विशेष कामगिरीसाठी रिवार्ड या प्रक्रियेमध्ये काही बदल लवकरच केले जातील असे शुक्ला यांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पोलादपूर -महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

SCROLL FOR NEXT