rashmi bagal , tanaji sawant, karmala , pune, shivsena, eknath shinde group saam tv
महाराष्ट्र

मुख्यमंत्री शिंदे गटास बाप्पा पावणार ! सेना नेत्याची पक्षास साेडचिठ्ठी ?

रश्मी बागल यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यास ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारत नागणे

Rashmi Bagal : करमाळ्यातील शिवसेना नेत्या रश्मी बागल आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यामध्ये रविवारी पुण्यात बैठक झाली. या बैठकीनंतर रश्मी बागल या शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान आज मंत्री तानाजी सावंत (tanaji sawant) हे साेलापूर (solapur) जिल्हा दाै-यावर आल्यानं बागल यांच्या समर्थकांसह राजकीय वर्तुळातील कार्यकर्त्यांचे बागल यांच्या भुमिकेवर लक्ष लागून राहिली आहे.

सन 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये रश्मी बागल या करमाळा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवार होत्या. त्यांच्या विरोधात माजी आमदार नारायण पाटील हे बंडखोर उमेदवार म्हणून निवडणुकीला उभे होते. दरम्यान मंत्री तानाजी सावंत यांनी नारायण पाटील आणि रश्मी बागल यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत अशी चर्चा आहे.

त्यातूनच मंत्री सावंत यांनी रविवारी रश्मी बागल आणि नारायण पाटील यांच्या समवेत बैठक घेतली आहे. यापूर्वी नारायण पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. रश्मी बागल यांच्या ताब्यात असलेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला मंत्री सावंत यांच्या भैरवनाथ शुगरने ९ कोटी रुपयांची मदत केली आहे. त्याच्यानंतर आता रश्मी बागल या मंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचा चर्चा सुरू झाली आहे.

आज (साेमवार) मंत्री तानाजी सावंत सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यादरम्यान रश्मी बागल शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. रश्मी बागल यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यास ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे साेलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालयात पाेहचले आहेत. तेथे मंत्री सावंत यांनी विविध विभागांना भेट दिली. त्यांच्या अचनाक भेटीने रुग्णालय व्यवस्थापनास घाम फुटला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील वारणा धरणातून विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT