बलात्काराच्या आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या ! अरुण जोशी
महाराष्ट्र

बलात्काराच्या आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या !

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीने पोलीस कोठडीत आत्महत्या केल्याने अमरावती शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

अरुण जोशी

अमरावती : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीने पोलीस कोठडीत आत्महत्या केल्याने अमरावती शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमरावतीच्या फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनमध्ये सागर श्रीपत ठाकरे (वय 24,रा.खंबीत, ता. आष्टी, जि. वर्धा ) या युवकावर अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा गुन्हा दाखल होता.

हे देखील पहा -

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून सदर मुलीला परत आणले. त्यानंतर मुलीच्या तक्रारीवरून सागरवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्यात चौकशी करण्यासाठी पोलिसांनी सागरला अमरावतीमध्ये बोलवले व त्याला अटक केली. फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनमध्ये लॉकअपची व्यवस्था नसल्याने सागरला काल राजापेठ पोलीस स्थानकातील लॉकअप मध्ये ठेवण्यात आले.

त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास सागरने आपल्या शर्टच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी 7 च्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. शहर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉक्टर तसेच सीआईडीचे अधीक्षक अमोल गावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Weather : महाराष्ट्र गारठला! परभणीत पारा ५.५ अंशावर, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, आज कसं राहिलं हवामान?

Maharashtra Live News Update: पंढरपुरात ऊस दर आंदोलन पेटले, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी 4 ट्रॅक्टरचे टायर फोडले

Congress: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन, ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Todays Horoscope: या राशींची आज द्विधा मनस्थिती असेल; जाणून घ्या राशीभविष्य

आजचा दिवस कोणासाठी लकी? कृष्ण नवमीमुळे या राशींना मिळणार अनुकूल परिणाम

SCROLL FOR NEXT